Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पड रे पाण्या, कर पाणी पाणी…’ पावसाची अक्षरशः दांडी! मोखाड्यातील शेतकरी संकटात

पालघर जिल्ह्यात पावसणारे अक्षरशः दांडी मारली आहे. लावणीचा हंगाम सुरु झाला आहे. अशामध्ये पावसाची गरज भासत आहे. त्यामुळे मोखाडा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 18, 2025 | 03:07 PM
‘पड रे पाण्या, कर पाणी पाणी…’ पावसाची अक्षरशः दांडी! मोखाड्यातील शेतकरी संकटात
Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड,   मोखाडा: मोखाडा तालुक्यात यंदा पावसाने अक्षरशः दांडी मारल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहेत. पावसावर अवलंबून असलेल्या हंगामी शेतीवर जगणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना संततधार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागली, वरई आणि हळवी या मुख्य पिकांची आवणी पूर्णपणे खोळंबली असून, उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

Matheran News : पालिकेचे लाल मातीच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष; घोडेस्वारांनी भरले खड्डे

मोखाडा व जव्हार तालुक्यातील बहुतेक शेतकरी ही लहान शेतजमीन असलेली कुटुंबे असून ते ८ ते ९ महिने रोजंदारी करून हंगामी शेतीसाठी पैसा साठवतात. शेतात आवणी सुरू करताच पावसाने पाठ फिरवली आणि अनेक ठिकाणी अर्धवट लावणी झालेली असून उरलेले पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी चंद्रकांत झोले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही पायात चप्पलही न घेता पैसे वाचवतो आणि शेतीसाठी जमवतो. पण निसर्गानेच पाठ फिरवली, तर कोणाच्या दारात जाऊ?”

दुसरीकडे, शेतकरी कोंडाजी ठोमरे सांगतात की, “सुरुवातीला पावसाचे प्रमाण खूप जास्त होते, त्यामुळे रोपांची वाढ खुंटली. आता रोपे तयार झाली तरी लावणी करता येत नाही, कारण शेती कोरडीठाक आहे. नागली, भाता यांसारखी पिके संततधार पावशिवाय लावता येत नाहीत.”

या परिसरात सिंचनाची कोणतीही शाश्वत सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पावसावरच संपूर्ण शेती अवलंबून आहे. तालुक्यात २–३ दिवस पाऊस न पडला, तरी पिकांना ताण येतो. सध्या मात्र पावसाने सातत्याने ओढ दिल्यामुळे, संपूर्ण तालुक्यातील लावणी कामे थांबली आहेत. त्यातच हवामान खात्याचा १७ ते २२ जुलैदरम्यान पावसाचा कमी अंदाज ही चिंता आणखी वाढवत आहे.

लोहगाव विमानतळावरून बुकिंग रद्द करणाऱ्या कॅब चालकांना ‘नो एन्ट्री’; एरोमॉल प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

या सर्व पार्श्वभूमीवर, मोखाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. कष्टाने उभं केलेलं पीक हातातून निसटतंय, त्यामुळे “पड रे पाण्या, कर पाणी पाणी” असा आर्त आक्रोश शेतकऱ्यांच्या ओठांवर आहे. जर लवकरात लवकर समाधानकारक पाऊस झाला नाही, तर मोखाड्यातील हजारो शेतकऱ्यांना उपासमारीचा सामना करावा लागेल. सरकारने वेळीच लक्ष घालून मदत करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

Web Title: Farmers in mokhada in trouble due to lack of rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • palghar
  • Rain News

संबंधित बातम्या

Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
1

Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

Maharashtra Rain News: आता सुट्टी नाही! कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस अक्षरशः….; IMD च्या अलर्टने वाढली चिंता
2

Maharashtra Rain News: आता सुट्टी नाही! कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस अक्षरशः….; IMD च्या अलर्टने वाढली चिंता

Delhi Heavy Rain : दिल्लीत मुसळधार पाऊस; 100 पेक्षा रेल्वेगाड्यांना फटका, 50 गाड्या रद्द तर 40 गाड्यांचे मार्ग…
3

Delhi Heavy Rain : दिल्लीत मुसळधार पाऊस; 100 पेक्षा रेल्वेगाड्यांना फटका, 50 गाड्या रद्द तर 40 गाड्यांचे मार्ग…

राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी…
4

राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.