माथेरान/संतोष पेरणे : शहरात प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे रस्ते अजूनही लाला मातीचे आहेत.माथेरान मध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि त्यामुळे लाला मातीच्या रस्त्यांवर असलेली माती पाण्यासोबत वाहून जाते आणि रस्ते खराब होतात.सध्या माथेरान शहरातील शार्लोट लेककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड वर आले असून त्याचा परिणाम रस्त्यांवरून घोड्यांना वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे. त्यात माथेरान नगरपरिषद लाल मातीच्या रस्त्यांची दुरुस्ती करीत नसल्याने घोड्यांवरून पर्यटकांना नेले धोक्याचे बनले आहे. दरम्यान माथेरानमधील घोडेस्वार यांनी आता शार्लोट लेक ते ब्राईडलँड हॉटेल या रस्त्यावरील मोठं मोठे दगड स्वतः उचलून रस्त्यावरून घोड्यांची वाहतूक सुखकर होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
माथेरान शहरात लाल मातीचे रस्ते असून कोणत्याही प्रकारच्या वाहनांना बंदी आहे.माथेरान मध्ये घोडा हे अवहातुकीचे साधन असून आता माथेरान शहरातील हुतात्मा चौकात येण्यासाठी पर्यावरण पूरक ई रिक्षा यामधून प्रवासी वाहतूक सुरु आहे. मात्र शहरातील प्रेक्षणीय स्थळी जाण्यासाठी घोडे हा पर्याय पूर्वीपासून आहे तो तसाच आहे. माथेरान शहरात अजूनही प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे रस्ते हे लाल मातीचे असून त्या रस्त्यांची दरवर्षी दुरुस्ती करावे लागते. मात्र माथेरानमधील पाऊस मोठा असल्याने लाल मातीचे रस्ते खराब होतात. शहरातिल ब्राइटलँड ते शार्लोट लेक या रस्त्यावर टाकण्यात आलेली माती धुवून गेली असून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठं मोठे दगड यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे रस्त्याने वाहतूक करणारे घोडे आणि त्या घोड्यांवरून प्रवास करणारे पर्यटक यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. पालिकेकडे त्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी सातत्याने घोडेस्वारांकडून मागणी केली जात होती.
मात्र माथेरान नगरपरिषदेकडून रस्त्याची दुरुस्ती करण्याची कोणतीही कार्यवाही केली जात नाही आणि त्यामुळे शेवटी प्रवासी पर्यटक यांचा जीवाला धोका निर्माण होऊ नये. त्यासाठी आता घोडेस्वारांनी स्वतःच रस्त्यावरील दगड बाजूला करून खड्डे भरण्याची कामं केली आहेत. माथेरान शहरातील घोडेवाले यांनी रस्त्यासाठी श्रमदान केले असून त्यामुळे रस्त्यावरून येजा करणे सोपे होत आहे. माथेरान पालिकेच्या या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे कोणत्या घोड्याला अपघात झाल्यास पालिका जबाबदार असणार आहे. त्याचवेळी त्या घोड्यावरून प्रवास करणारे पर्यटक यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होण्याची भीती अशा प्रकारच्या रस्त्यामुळे निर्माण झाली आहे असा आरोप घोडेस्वार करीत आहेत.