Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Protest: ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!

Farmers Protest: ऊसदर जाहीर करण्यासाठी कारखानदारांना देण्यात आलेली दोन दिवसांची मुदत संपूनही एकाही साखर कारखान्याने दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रविवारी, १५ तारखेला दुपारी १ वाजता नवारस्ता येथे कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 14, 2026 | 11:23 AM
ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!

ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!

Follow Us
Follow Us:
  • ऊसदर जाहीर न केल्याने शेतकरी संघटना आक्रमक
  • रविवारी नवारस्त्यात रास्ता रोको आंदोलन!
  • कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम
पाटण, (वा.) जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समन्वय बैठकीत कारखानदारांना ऊसदर नाहीर करण्यासाठी २ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत संपूनही एकाही कारखान्याने आपला दर जाहीर केला नसल्याने आता बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना तसेच इतर शेतकरी संघटना यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी १५ रोजी दुपारी १ वाजता नवारस्ता येथे कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सर्व संघटनांच्यावतीने पाटण येथे पत्रकार परिषदेत बोलताना देण्यात आली.(Farmers Protest)

नवारस्ता येथे आंदोलनाची घोषणा

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी दराच्या प्रतीक्षेत असताना कारखानदारांकडून ऊसदर नाहीर करण्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली जात नाही. यापूर्वी बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत कांती संघटना तसेच इतर शेतकरी संघटना यांच्यावतीने ऊसदराचा प्रश्न उपस्थित करत नवारस्ता येथे आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

Mahabaleshwar News: पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले! महाबळेश्वर बाजारपेठ पुन्हा अतिक्रमणांच्या विळख्यात

त्यानंतर या प्रश्नावर शासनस्तरावर चर्चा होऊन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कारखानदारांना ऊसदर जाहीर करण्यासाठी २ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत संपूनही दर जाहीर न झाल्याने शेतकरी संघटनांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

१५ नोव्हेंबर रोजी चक्काजाम आंदोलन

कारखानदारांना बैठकीत दिलेली मुदत संपूनही ऊसदर जाहीर झालेला नसल्याने शेतकरी संघटनांनी १५ नोव्हेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून कारखानदार आणि शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधण्यात येणार आहे. ऊसदराचा प्रश्न केवळ पाटण तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक भविष्याशी निगडीत असल्याने शेतकऱ्यांनी एकजुटीने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत यादव, शेतकरी संघटना पाटण तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रीय समाज पक्ष सातारा जिल्हा युवक अध्यक्ष विकास कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेतकरी संघटना तात्या पाटील, बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष उत्तम साळुंखे, रयत क्रांती शेतकरी संघटना कराड तालुका उपाध्यक्ष विशाल पुस्तके, शेतकरी संघटना पाटण तालुका उपाध्यक्ष काशिनाथ शिर्के व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी

रविवार १५ नोव्हेंबर रोजी नवारस्ता येथे होणारे चक्काजाम आंदोलन हे कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. यावर्षी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे शेतकऱ्यांना योग्य ऊसदर मिळवून देण्यासाठी सर्व शेतकरी संघटना एकजुटीने मैदानात उतरल्या आहेत. ऊसदर जाहीर होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व शेतकरी हितचिंतकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जिल्हाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना चंद्रकांत यादव यांनी म्हटलं आहे.

एकीकडे दुष्काळाचे पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री शेतकऱ्यांकडे असणाऱ्या कर्जबाबत वित्तीय संस्थांना वसुलीसाठी तगदा लावू नये अशी भूमिका मांडताना दिसत आहेत. मात्र शासनाचा जलसंपदा विभाग हा शेतकऱ्यांकडे थकीत पाणीपट्टी वसुलीच्या तगादा लावताना दिसत आहे, ही दुटप्पी भूमिका जर थांबली नाही तर जशास तसे उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटना पाटण तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली.

E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर बीपीसीएलचे स्पष्टीकरण; 893 नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण योग्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेतकरी संघटनांचे रास्ता रोको आंदोलन कुठे होणार आहे?

    Ans: नवारस्ता येथे कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे.

  • Que: आंदोलन कधी सुरू होणार आहे?

    Ans: रविवार, दि. १५ रोजी दुपारी १ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.

  • Que: शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा निर्णय का घेतला?

    Ans: जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय बैठकीत कारखानदारांना ऊसदर जाहीर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत संपूनही कोणत्याही कारखान्याने दर जाहीर न केल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Farmers organizations road block protest sugarcane rate navarasta patan sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Chiplun
  • Farmers Protest
  • maharashtra

संबंधित बातम्या

Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात
1

Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात

Pratap Sarnaik: नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळले? एसटी भरतीतील गैरप्रकारांची सखोल चौकशी होणार
2

Pratap Sarnaik: नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळले? एसटी भरतीतील गैरप्रकारांची सखोल चौकशी होणार

Sewerage Project : भुयारी गटार योजनेवर आणखी ४७६ कोटींची उधळपट्टी? पहिल्या टप्प्याचे काम अपूर्ण असतानाच दुसऱ्या टप्प्याला मंजुरी
3

Sewerage Project : भुयारी गटार योजनेवर आणखी ४७६ कोटींची उधळपट्टी? पहिल्या टप्प्याचे काम अपूर्ण असतानाच दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

दिवाळीत ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट! पुणे-नांदेड प्रवासासाठी 2 ते 3 हजारांचा भुर्दंड; RTO अधिकारी नेमके कुठे?
4

दिवाळीत ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट! पुणे-नांदेड प्रवासासाठी 2 ते 3 हजारांचा भुर्दंड; RTO अधिकारी नेमके कुठे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.