Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार

पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन मोबदल्याची प्रक्रिया डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2025 | 01:49 PM
पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; 'या' महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार

पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; 'या' महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार

Follow Us
Close
Follow Us:
  • पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट
  • विमानतळासाठी एकूण १२८५ हेक्टर जमीन लागणार
  • शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार
पुणे : पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन मोबदल्याची प्रक्रिया डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाची अधिसूचना १० मार्च २०२५ रोजी जारी केली होती. त्यानुसार भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्विकास अधिनियम, २०१३ अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, “निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच भरपाई प्रक्रिया सुरू करता येईल. आवश्यक असल्यास आम्ही तातडीच्या परवानग्या घेऊ.”

४,५०० कोटींचा निधी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) विमानतळ प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमीन खरेदीसाठी सुमारे ४,५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. या रकमेचा वापर शेतकऱ्यांना थेट भरपाई देण्यासाठी केला जाणार आहे. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जमीन संपादनासाठी एसपीव्ही (Special Purpose Vehicle) आणि आरएफक्यू प्रक्रिया एकाच वेळी सुरू होईल.

पात्र शेतकऱ्यांसाठी दुप्पट भरपाईचे नियम लागू राहतील. शेतघरं, विहिरी, शेतीपंप, झाडे, फळबागा आणि १०% विकसित जमीन असे अतिरिक्त लाभही दिले जाणार आहेत. १२८५ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. विमानतळासाठी एकूण १२८५ हेक्टर जमीन लागणार आहे. एकतपूर, खानवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पारगाव, उदाचिवाडी आणि वनपुरी. जमीनमालकांची सहमती घेण्याची प्रक्रिया सुरु असून, ९५% पेक्षा जास्त मालकांनी तत्त्वत: संमती दर्शवली आहे. भरपाई ४ पट नव्हे तर ५ पट द्या, काही शेतकऱ्यांनी भरपाई सध्याच्या बाजारभावाशी सुसंगत नाही, असा आक्षेप नोंदवला.

Web Title: Farmers will get compensation for land given for purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

पुरंदर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास
1

पुरंदर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास

इकडचे मतदार तिकडे, तिकडचे इकडे! पुण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ
2

इकडचे मतदार तिकडे, तिकडचे इकडे! पुण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, नागरिक त्रस्त; महापालिकेवर जोरदार टीका
3

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, नागरिक त्रस्त; महापालिकेवर जोरदार टीका

राजकीय घडामोडींनी वातावरण तापले, राजगुरुनगरमध्ये चौरंगी लढत; कोणाला कौल मिळणार?
4

राजकीय घडामोडींनी वातावरण तापले, राजगुरुनगरमध्ये चौरंगी लढत; कोणाला कौल मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.