
नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. वडंबा शिवारात बुधवारी (दि.29) दुपारी दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे.
जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली सत्यम ट्रॅव्हल्स (एमपी. २२ झेडजी ५८२२) आणि नागपूरहून जबलपूरच्या दिशेने येत असलेली कार (एमपी २० झेडए ००१४) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि ट्रॅव्हल्सला थेट धडकली. या अपघातात कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडकेनंतर ट्रॅव्हल्स चालकाने वाहन बाजूला घेतल्याने ट्रॅव्हल्स उभ्या ट्रक (आरजे ११ जीसी ६६६३) हा ट्रक नागपूरच्या दिशेने जाण्याकरिता वंडबा येथे उभा होता, त्याला जाऊन आदळली.
हेदेखील वाचा : आनंदाचा उत्साह, दुःखाच्या किंचाळीत बदलला! झिपलाइन वायर तुटली अन् मनालीत 12 वर्षांची मुलगी 30 फुटाच्या दरीत कोसळली; Video Viral
या दुर्घटनेत कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिस तसेच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्ग वाहतूक सुरळीत केली.
अनेकजण जखमी, एक गंभीर
जखमीमध्ये रूपचंद मारुती दिवटे (वय ६२, रा. काळा फाटा ता. पारशिवनी), शकुंतला रूपचंद दिवटे (वय 54), ट्रॅव्हल्समधील जखमी चालक राजू कंचनलाल बौरसिया (वय 35 वर्ष, रा. केवलारी ग्राम खैरी जिल्हा सिवनी), हेल्पर संजय जुमनलाल मरसकोल्हे (वय 21, रा. घोगरी, जिल्हा सिवनी), बस कंडक्टर संजय रवी यादव (वय ३२. रा. दुर्गा चौक लखनौ), प्रवासी संदीप टिकाराम करेंगे (वय ३२. छपरा सिवनी), तालन सुजन सिंग (७४, रा. बिछया, जि. छिंदवाडा) यांसह इतर काहीजण जखमी झाले.