Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांवरसुद्धा FDAची नजर; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स’

सण-उत्सवांच्या काळात अन्नभेसळीला आळा घालण्यासाठी FDAने मोठा निर्णय घेतला आहे. महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांसह हाय-रिस्क अन्नपदार्थांची तपासणी करण्यासाठी वर्षभराचा स्थायी आदेश लागू करण्यात आला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 03, 2026 | 08:17 PM
आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांवरसुद्धा FDAची नजर; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांवरसुद्धा FDAची नजर; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांची प्रत्यक्ष तपासणी
  • सणाच्या 21 दिवस आधीपासून FDAची मोहीम
  • भेसळ आढळल्यास थेट कायदेशीर कारवाई
 

मुंबई : सण-उत्सव म्हटलं की भाविकांची गर्दी, महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांची लगबग आलीच. मात्र याच काळात मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळीचा धोका देखील वाढतो. आता या सगळ्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) थेट नजर राहणार आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सण-उत्सवांच्या काळातील अन्नभेसळ रोखण्यासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा निर्णय जाहीर केला आहे.

या निर्णयानुसार वर्षभरातील प्रमुख सणांसाठी स्वतंत्र आदेश काढण्याची गरज राहणार नाही. महाप्रसाद, लंगर, भंडारे आणि सणांशी संबंधित अन्नविक्रीच्या ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे सर्व धर्मांच्या प्रमुख सणांचा यात समावेश करण्यात आला आहे.

सणांचं तीन स्तरांत वर्गीकरण

FDAने वर्षभराचं सणांचं कॅलेंडर तयार केलं असून त्यांचं तीन स्तरांत वर्गीकरण करण्यात आलं आहे. राज्यव्यापी सणांमध्ये गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्येचा समावेश आहे. प्रादेशिक स्तरावर मकर संक्रांत, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी आणि कार्तिक वारी, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंतीचा समावेश आहे. तर स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस यांचाही तपासणीच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?

सणाच्या 21 दिवस आधीच कारवाईला सुरुवात

FDAची मोहीम सणाच्या तब्बल 21 दिवस आधी सुरू होणार असून सण संपल्यानंतरही 30 दिवस कारवाई सुरू राहणार आहे. सुरुवातीला हाय-रिस्क अन्नपदार्थांची माहिती गोळा केली जाईल. त्यानंतर गिरण्या, घाऊक बाजारपेठा आणि वाहतुकीवर लक्ष ठेवत विशेष नाका तपासणी केली जाईल.

सणाच्या दिवशी भरारी पथकांकडून अचानक तपासणी केली जाणार आहे. महाप्रसादाच्या ठिकाणी स्वच्छता, अन्नाची हाताळणी आणि वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचीही पाहणी होईल.

दूध, मिठाईपासून मांस आणि पाण्यापर्यंत तपासणी

भगर, साबुदाणा, राजगिरा यांसारख्या उपवासाच्या पदार्थांपासून दूध, खवा, पनीर, तूप, मिठाई आणि सुकामेव्यापर्यंत हाय-रिस्क पदार्थांची तपासणी केली जाणार आहे. मांस, पाणी आणि बर्फाच्या बाबतीत स्वच्छता आणि शीत साखळीची विशेष तपासणी होईल.

‘खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा, मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?’ – नाना पटोले

मिठाईवरील चांदीचा वर्ख खरा आहे का, खाद्यरंग नियमांनुसार वापरला आहे का, याकडेही FDAचं लक्ष असेल. ईद, रमजान, नाताळ आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर संबंधित अन्नपदार्थांची विशेष तपासणी केली जाणार आहे.

भेसळ आढळल्यास कारवाईत कोणतीही ढिलाई न ठेवता ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतली जाणार आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई करून आवश्यक प्रकरणे न्यायालयात दाखल केली जातील. त्यामुळे आता सणाचा महाप्रसाद असो, लंगर असो किंवा भंडारा—चवीसोबत अन्नाची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Fda standing orders all festivals food safety tukaram mundhe mahaprasad langar bhandara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?
1

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई
2

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
3

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या
4

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.