Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई

FDA: मार्केट यार्ड येथील मे. ३डी मसाले अँड ड्रायफ्रूट्स या आस्थापनेत तपासणीदरम्यान चहा, फ्लेवर्ड ड्रिंक कॉन्सन्ट्रेटसह एकूण ७७.७५ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या पदार्थांचा दर्जा निकृष्ट व ते असुरक्षित असल्याचा तसेच लेबलिंगमध्ये त्रुटी असल्याचा संशय आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 23, 2026 | 04:07 PM
FDA Chief Tukaram Mundhe

FDA Chief Tukaram Mundhe

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा साठा जप्त
  • सणासुदीत भेसळखोरांवर एफडीएची धडक
  • तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएची धडक कारवाई 
Pune/FDA: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई केली. पुण्यातील विविध भागांत केलेल्या तपासणीत ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा, ७७.७५ किलो विविध अन्नपदार्थ आणि ९ हजार ८८८ लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्नपदार्थांची अयोग्य वाहतूक व साठवणूक, खुल्या स्वरूपात विक्री, चुकीचे लेबल आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळून आले.
बावधन, कसबा पेठ आणि बिबवेवाडी परिसरात अनियंत्रित तापमानात पनीर व खव्याची वाहतूक आणि साठवणूक तसेच खुल्या स्वरूपात विक्री होत असल्याचे आढळले. त्यामुळे ९ हजार किलो पनीर आणि ४४० किलो खवा जप्त करण्यात आला. हे पदार्थ मानवी सेवनासाठी असुरक्षित असण्याचा संशय असून, त्याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.
Smart Bazaar तील अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटदुखी, उलट्यांचा त्रास? ग्राहकाने केली कारवाईची मागणी
मार्केट यार्ड येथील मे. ३डी मसाले अँड ड्रायफ्रूट्स या आस्थापनेत तपासणीदरम्यान चहा, फ्लेवर्ड ड्रिंक कॉन्सन्ट्रेटसह एकूण ७७.७५ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या पदार्थांचा दर्जा निकृष्ट व ते असुरक्षित असल्याचा तसेच लेबलिंगमध्ये त्रुटी असल्याचा संशय आहे. आस्थापनेत स्वच्छतेच्या नियमांचेही उल्लंघन आढळले. दरम्यान, पौड रोडवरील चांदणी चौक परिसरातील सूर्यम एंटरप्रायजेस येथून विविध प्रकारच्या खाद्यतेलाचा ९ हजार ८८८ लिटर साठा जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणांत अन्नसुरक्षा नियमांनुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.

मिथेनॉलप्रकरणी पुणे विभागातील ४३ कंपन्यांवर कारवाई
विषारी दारूमुळे १९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मिथेनॉलशी संबंधित कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे विभागातील मिथेनॉलशी संबंधित सर्व १०२ परवानाधारक कंपन्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ४३ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २८ कंपन्यांचे परवाने निलंबित, तर १५ कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

विषारी दारूच्या घटनेनंतर राज्यभर मिथेनॉलशी संबंधित कंपन्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. राज्यात मिथेनॉलशी संबंधित सर्वाधिक कंपन्या पुणे विभागात असल्याने गेल्या चार महिन्यांपासून या कंपन्यांच्या कामकाजाची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार विभागातील सर्व १०२ परवानाधारकांची तपासणी पूर्ण झाली आहे.

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय

नियमांचे पालन करण्यावर भर

मिथेनॉलचा साठा, खरेदी-विक्री, वापर आणि हाताळणीसाठी आधीपासूनच नियम निश्चित आहेत. त्यामुळे नवीन नियम करण्याऐवजी विद्यमान नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याला एफडीएकडून प्राधान्य दिले जात आहे. परवाना निलंबित करणे आणि परवाना रद्द करणे या स्वतंत्र प्रशासकीय कारवाया आहेत. तपासणी पूर्ण झाली असली तरी कंपन्यांकडून नियमांचे सातत्याने पालन होत आहे की नाही, यावर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. मिथेनॉलचा गैरवापर रोखण्यासाठी नियमित तपासणी आणि नियमभंग झाल्यास कारवाई सुरूच राहणार असल्याचे एफडीएचे पुणे विभागाचे सहायक आयुक्त गिरीश हुकरे यांनी सांगितले.
💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात किती किलो पनीर जप्त?

    Ans: एफडीएने केलेल्या कारवाईत ९ हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे.

  • Que: पुण्यात एफडीएची कारवाई नेमकी कुठे?

    Ans: एफडीएने पुण्यात मार्केट यार्ड, बावधन, कसबा पेठ आणि बिबवेवाडी परिसरात कारवाई केली आहे.

Web Title: Fda raid in pune and sealed 9 thousand kg paneer and khava oil festival season tukaram mundhe pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • FDA
  • Festival News
  • paneer
  • pune news
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ
1

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ

पुण्यातील नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिकेकडून दुरुस्तीची कामे; नेहरू भवन ‘या’ तारखेपर्यंत बंद
2

पुण्यातील नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिकेकडून दुरुस्तीची कामे; नेहरू भवन ‘या’ तारखेपर्यंत बंद

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप
3

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!
4

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.