Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

FDA News: अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) औषध विभागाने ५ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील सातही विभागांमध्ये ९३७ तपासण्या केल्या. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे २९ परवाने रद्द, तर ७१ परवाने निलंबित करण्यात आले. औषध प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या २७९ नमुन्यांपैकी २१ नमुने अप्रमाणित आढळले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 23, 2026 | 06:40 PM
महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Follow Us
Follow Us:
  • बनावट आणि निकृष्ट औषधांविरोधात FDA ची धडक कारवाई
  • ९३७ तपासण्या, २८.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांना अटक
FDA News: महाराष्ट्रातील औषध विक्री, उत्पादन आणि सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमधील नियमभंगाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. ५ ते १७ ऑक्टोबर २०२६ या दोन आठवड्यांच्या कालावधीत राज्यातील सातही विभागांमध्ये एकूण ९३७ तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये आढळलेल्या त्रुटींप्रकरणी संबंधितांना ४५० नोटिसा बजावण्यात आल्या असून, २९ परवाने रद्द आणि ७१ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विनापरवाना औषध विक्री आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनाविरोधात पाच कारवाया करत एकूण २८ लाख ५२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उत्पादक आणि रक्तकेंद्रांच्या १०५ तपासण्या

औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक, रक्तकेंद्रे, रक्त साठवणूक केंद्रे तसेच औषध चाचणी प्रयोगशाळांच्या एकूण १०५ तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये ६८ नोटिसा बजावण्यात आल्या. गंभीर त्रुटी आढळलेल्या संबंधितांचे ७ परवाने रद्द, तर २२ परवाने निलंबित करण्यात आले.

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई

यामध्ये ॲलोपॅथी औषध उत्पादकांच्या ३६, आयुर्वेदिक औषध उत्पादकांच्या ४, सौंदर्यप्रसाधन उत्पादकांच्या ८, होमिओपॅथी औषध उत्पादकांच्या ४ आणि वैद्यकीय उपकरण उत्पादकांच्या ७ तपासण्यांचा समावेश आहे. याशिवाय औषध चाचणी प्रयोगशाळांच्या २, रक्तकेंद्रांच्या २२ आणि रक्त साठवणूक केंद्रांच्या २२ तपासण्या करण्यात आल्या.

औषध विक्रेत्यांच्या ८३२ तपासण्या

राज्यातील औषध विक्री परवानाधारकांच्या ८३२ तपासण्या करण्यात आल्या. नियमित तपासण्या, विशेष मोहिमेअंतर्गत केलेल्या तपासण्या आणि नागरिकांच्या तक्रारींवरून करण्यात आलेल्या तपासण्यांचा यामध्ये समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांना ३८२ नोटिसा बजावण्यात आल्या. याप्रकरणी २२ औषध विक्री परवाने रद्द, तर ४९ परवाने निलंबित करण्यात आले.

२७९ औषध नमुन्यांची तपासणी; २१ नमुने अप्रमाणित

FDA च्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील औषध प्रयोगशाळांमध्ये दोन आठवड्यांत एकूण २७९ औषध नमुन्यांची चाचणी पूर्ण करण्यात आली. त्यापैकी २५८ नमुने प्रमाणित दर्जाचे, तर २१ नमुने अप्रमाणित आढळले.

अप्रमाणित नमुन्यांमध्ये १८ नमुने निकृष्ट दर्जाचे (NSQ), दोन नमुने चुकीचे लेबल किंवा ब्रँडिंग असलेले (Misbranded) आणि एक नमुना बनावट (Spurious) असल्याचे आढळले. या औषधांबाबत कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत असून, पाच प्रकरणांमध्ये औषधे बाजारातून परत मागविण्याची (Recall) प्रक्रिया राबवण्यात आली.

जालना, नागपूर, बारामती आणि वसईमध्ये कारवाई

– जालना : नवजीवन मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या पेढीने परवाने जमा केल्यानंतरही विनापरवाना जागेत औषधांचा साठा ठेवून व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळले. येथे ५८ हजार ७७२ रुपयांचा ॲलोपॅथी औषधसाठा जप्त करण्यात आला.

– नागपूर : फिनिक्स मेडिकॉर्प येथे परवाने जमा केल्यानंतरही विनापरवाना जागेत औषधांचा साठा ठेवण्यात आल्याचे आढळले. या कारवाईत २२ लाख ३ हजार ७४४ रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला.

– बारामती : वेदास हर्बल्स महिला गृह उद्योग येथे विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचे म्हणजेच साबणाचे उत्पादन होत असल्याचे आढळले. ४ लाख ५ हजार ६७८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

– वसई पूर्व : जी. बी. कॉस्मेटिक्स येथे विनापरवाना नेलपॉलिशचे उत्पादन, पॅकिंग आणि विक्री सुरू असल्याचे आढळले. कच्चा माल, पॅकिंग साहित्य आणि यंत्रसामग्री असा १ लाख ८३ हजार ९१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगरमध्ये नायराझेपाम (Nitrosun 10) या गुंगीकारक औषधाच्या ३४ गोळ्यांची बेकायदेशीर खरेदी-विक्री केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी NDPS कायदा, १९८५ आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार कारवाई करून दोघांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणात १९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नागरिकांना FDA चे आवाहन

नागरिकांनी औषधे केवळ परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून बिलासह खरेदी करावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. निकृष्ट किंवा बनावट औषधे, विनापरवाना औषध अथवा सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन आणि विक्री तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने तक्रार करावी. यासाठी FDA च्या अधिकृत तक्रार पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवता येते किंवा नजीकच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधता येतो.

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रात FDA ने दोन आठवड्यांत किती तपासण्या केल्या?

    Ans: ५ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यातील सातही विभागांमध्ये एकूण ९३७ तपासण्या करण्यात आल्या.

  • Que: औषधांच्या नमुना तपासणीत काय आढळले?

    Ans: एकूण २७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २१ नमुने अप्रमाणित आढळले. यामध्ये १८ निकृष्ट दर्जाचे, दोन चुकीचे लेबल किंवा ब्रँडिंग असलेले आणि एक बनावट नमुना होता.

  • Que: औषध किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या बेकायदेशीर विक्रीबाबत तक्रार कुठे करावी?

    Ans: नागरिक FDA महाराष्ट्राच्या तक्रार पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात किंवा जवळच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयात तक्रार देऊ शकतात.

Web Title: Maharashtra fda 937 drug inspections 29 licences cancelled 71 suspended october 2026 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • FDA
  • maharashtra

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या बातमीचा दणका; स्मार्ट बाजारवर एफडीएची धडक!
1

Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या बातमीचा दणका; स्मार्ट बाजारवर एफडीएची धडक!

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
2

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई
3

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई

आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
4

आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.