Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैसे मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला घाबरुन, केडीएमसीने तोडले आपल्याच शाळेचे शौचालय

क्कादायक म्हणजे या शौचालयाची तक्रारीची ऑडिओ क्लीप समोर आली आहे. शौचालयाच्या कंत्राटदाराकडे पैशाची मागणी करीत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 15, 2024 | 03:33 PM
पैसे मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला घाबरुन, केडीएमसीने तोडले आपल्याच शाळेचे शौचालय
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा, खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदार संघात एक असा प्रकार समोर आला आहे. तो ऐकून खरंच या नेत्यांचा महापालिका प्रशासनावर वचक आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. एका शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता तयार करण्यात आलेले शौचालय अनधिकृत असल्याचे सांगत तोडण्यात आले. धक्कादायक म्हणजे या शौचालयाची तक्रारीची ऑडिओ क्लीप समोर आली आहे. शौचालयाच्या कंत्राटदाराकडे पैशाची मागणी करीत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका नेहमीच वादाच्या भोवऱ्यात पाहायला मिळते. केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याला यशही आले होते. कोविड काळात सूर्यवंशी यांनी जे काम केले ते उल्लेखनीय होते. मात्र त्यानंतर भाऊसाहेब दांगडे आले. त्यांच्यानंतर इंदूराणी जाखड या दोन्ही आयुक्तांचा अधिकारी वर्गावर कोणताही वचक नाही. हे उघड झाले आहे. कारण कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरात गफूर डोन ही महाालिकेची उर्दू शाळा आहे. या शाळेत शौचालय आहे. त्याची दुरावस्था झाली आहे. एक सार्वजनिक शौचालय आहे. ते लांब आहे. ही शाळा कल्याण शीळ रस्त्यालगत असल्याने वाहनांच्या रहदारीचा धोका असतो. त्यामुळे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी त्यांच्या सहकार्यास सांगून विद्यार्थ्यांना शौचालयाचे काम सुरु केले. स्वखर्चातून काम केले जात होते.

एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने त्याची तक्रार केली. शौचालय तयार करणारे सादीक शेख यांनी त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यासोबत चर्चा केली. तक्रार मागे घेण्यासाठी एक रक्कम ठरली. तक्रारदाराला पैसे मिळाले नाही. त्याने शौचालय तोडण्यासाठी तगादा सुरुच ठेवला. अखेर महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी शौचालयाचे काम जेसीबीने पाडून टाकले आहे. या कारवाई विराेधात नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या हजारो संख्येच्या बेकायदा बांधकामे सुरु आहे. परंतू महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केवळ महापालिका शाळेचे शौचालय दिसले हे चकित होण्यासारखीचं बाब आहे.

Web Title: Fearing an rti activist demanding money kdmc broke its own school toilet kalyan dombivli muncipal corporation maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2024 | 03:33 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan dombivli muncipal corporation
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
1

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

Kalyan Accident : 17 व्या मजल्यावरून क्रेन मजुरांवर कोसळली अन्…, बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
2

Kalyan Accident : 17 व्या मजल्यावरून क्रेन मजुरांवर कोसळली अन्…, बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Meenakshi Shinde Resignation: निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिंदेंना मोठा धक्का! माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा
3

Meenakshi Shinde Resignation: निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिंदेंना मोठा धक्का! माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश
4

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.