Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ॲक्शन मोडमध्ये! सोलापुरात २५ कडुलिंबाच्या झाडांची कत्तल टळली; कटर मशीनसह ॲसिड जप्त

सोलापूरच्या निर्मिती विहार परिसरात २५ कडुलिंबाच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या सतर्कतेमुळे टळली आहे. दोषींवर कडक कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 08, 2026 | 05:57 PM
सोलापुरात २५ कडुलिंबाच्या झाडांची कत्तल टळली

सोलापुरात २५ कडुलिंबाच्या झाडांची कत्तल टळली

Follow Us
Follow Us:
  • उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ॲक्शन मोडमध्ये!
  • सोलापुरात २५ कडुलिंबाच्या झाडांची कत्तल टळली
  • कटर मशीनसह ॲसिड जप्त
सोलापूर (शहर प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे निर्मिती विहार परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेतील तब्बल २५ कडुलिंब वृक्षांची होणारी कत्तल टळली आहे. या वृक्षतोडीसाठी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपमहापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

निर्मिती विहार परिसरातील काही जागरूक नागरिकांना महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये संशयास्पद पद्धतीने वृक्षतोड सुरू असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने याबाबत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांना माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून त्वरित कारवाईचे निर्देश दिले.

अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर एक कडुलिंब वृक्ष आधीच तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच आणखी २५ वृक्ष तोडण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान वृक्षतोडीसाठी वापरण्यात येणारे कोयते, मशीन, पेट्रोल, रासायनिक पदार्थ (ॲसिड) तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.

Solapur News: शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला जाईल; जिल्हाधिकाऱ्यांचे समर्थन समितीला आश्वासन

संबंधितांकडून वृक्षतोडीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचेही तपासात उघड झाले. या गंभीर प्रकाराची दखल घेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी संबंधितांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

यापूर्वी शहरातील ११० वृक्षतोडीचे प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एका वृक्षतोडीच्या प्रयत्नाचा पर्दाफाश झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

“वृक्ष हे शहराचे फुफ्फुस”

“वृक्ष हे शहराचे फुफ्फुस आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अशा प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”-ज्ञानेश्वरी देवकर, उपमहापौर, सोलापूर महानगरपालिका

‘ऊस दिला, घाम दिला; आता न्याय न मिळाल्याने शेतकरी ‘जलसमाधी’च्या उंबरठ्यावर, ‘गोकुळ’च्या थकीत ऊस बिलासाठी संघर्ष तीव्र

Web Title: Felling of 25 neem trees averted in solapur acid and a cutting machine seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur News
  • tree cutting

संबंधित बातम्या

सोलापूरच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाला हिरवा कंदील; ३ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार
1

सोलापूरच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाला हिरवा कंदील; ३ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर
2

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका
3

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम!
4

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.