मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळा कार्यक्रम आज सकाळी पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Sshah) यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis) हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण भर दुपारी पार पडलेल्या याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. त्यानंतर अनेक श्री सेवकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आणखी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. तसेच यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भरदुपारी झालेल्या या कार्यक्रमाला 20 लाख श्री सेवकांची उपस्थिती होती. कार्यक्रम दुपारी एकच्या सुमारास संपला, त्यानंतर भर उन्हात इतका वेळ बसलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यातच कडक उन्हाचा तडाखा बसत असतानाही लोकांनी या कार्यक्रमला हजेरी लावली होती. मात्र, आता याच कार्यक्रमात घडलेल्या प्रसंगाविषयी माहिती येत आहे. यामध्ये तीव्र उष्णतेमुळे काही लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली जात आहे तर यामध्ये जवळपास 300 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ही बातमी संध्याकाळी वाऱ्यासारखी पसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्रुयांनी ग्णांची विचारपूस केली. उष्माघाताचा त्रास अधिक झाल्याने गंभीर रुग्णांना खारघरच्या टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. उष्माघातामुळं सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदतही जाहीर करण्यात आलीय.
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस-
काल सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे. जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत.