Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: शनिशिंगणापूर देवस्थानचा आर्थिक कारभार संशयाच्या भोवऱ्यात! 14 जानेवारीला सुनावणी

शनिशिंगणापूर देवस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहे. देवस्थानच्या आर्थिक व्यवहाराबाबत काही गंभीर आरोप करण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 26, 2025 | 07:58 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • शनिशिंगणापूर देवस्थान पुन्हा वादात अडकले
  • देवस्थानचा आर्थिक कारभार संशयाच्या कचाट्यात
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
जगप्रसिद्ध श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले असून, अनावश्यक कर्मचारी भरती, आर्थिक गैरव्यवहार आणि ऑनलाइन पूजा ॲप घोटाळ्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणामुळे देवस्थानचे प्रशासनच नव्हे, तर शासनाची नियंत्रण यंत्रणाही हादरली आहे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित गैरप्रकारांनी देवस्थानच्या कारभाराच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

मागील काही वर्षांत देवस्थानमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक, नियमबाह्य आणि बोगस पद्धतीने कर्मचारी भरती झाल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. याचबरोबर भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत ऑनलाइन पूजा अॅपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याने देवस्थानचा संपूर्ण आर्थिक कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

CM Devendra Fadnavis: ‘मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी…..; वीर बाल दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे

श्रद्धेच्या नावाखाली चालणारा कोणताही कारभार हा पारदर्शक, नियमबद्ध आणि जबाबदार असायलाच हवा. चौकशी ही केवळ कागदोपत्री न राहता, खऱ्या दोषींना समोर आणणारी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणारी असणे आवश्यक आहे. अन्यथा, शनिशिंगणापूरसारख्या पवित्र देवस्थानात घडलेले हे प्रकार संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतीक ठरतील. १४ जानेवारी २०२६ रोजी होणारी सुनावणी ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून, श्रद्धा आणि शासनाच्या विश्वासार्हतेची खरी कसोटी असणार आहे.

अपारदर्शक तपासावर प्रश्नचिन्ह

सहा महिने उलटून गेले असतानाही केवळ दोन आरोपींना अटक झाली असून, प्रत्यक्षात दहा ते पंधरा जणांचा सहभाग असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे तपास जाणीवपूर्वक ‘मॅनेज’ केला जात असल्याचा आरोप जाणकारांकडून केला जात आहे. शनिशिंगणापूर हे केवळ देवस्थान नसून, कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आणि प्रचंड आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. येथे होणारा कोणताही गैरप्रकार हा केवळ प्रशासकीय चूक न राहता, थेट श्रद्धेवर घाला घालणारा ठरतो.

अनावश्यक कर्मचारी भरतीमुळे देवस्थानच्या आर्थिक तिजोरीवर मोठा ताण पडतो, तर ऑनलाइन पूजा अॅपमधील अपारदर्शक व्यवहारांमुळे भाविकांचा विश्वास डळमळीत होत आहे.

Nanded Politics : मुख्यमंत्र्यांची सभा, तरीही पराभव! संतोष बांगर यांचे संघटनकौशल्य निर्णायक

१४ जानेवारीला निर्णायक सुनावणी

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाने थेट देवस्थानच्या विश्वस्त मंडळाला चौकशी नोटिसा बजावल्या आहेत. अधीक्षक सीमा केणी यांनी विश्वस्तांना आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले असून, देवस्थानतर्फे २३ डिसेंबर रोजी लेखी म्हणणे सादर करण्यात आले आहे. या म्हणण्यावर १४ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर सुनावणी होणार असून, ही तारीख निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभेपर्यंत उमटले पडसाद

या प्रकरणाचे पडसाद थेट महाराष्ट्र विधानसभेत उमटले. नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे बोगस कर्मचारी भरती आणि ऑनलाइन पूजा अॅप घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे स्पष्ट आदेश दिले. मात्र प्रत्यक्ष तपासाची दिशा पाहता, या आदेशांची अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

शेकडो कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर तपासात केवळ सुमारे एक कोटी रुपयांचे व्यवहार समोर येणे संशयास्पद ठरत आहे. धर्मादाय आणि सायबर क्राईम विभागाच्या वरिष्ठ पातळीवरील चौकशीचे आदेश असतानाही तपास अहिल्यानगर सायबर क्राईम पथकापुरताच मर्यादित राहिल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

Web Title: Financial affairs of shani shingnapur temple are under suspicion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Shani Shingnapur

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाला सोनेरी बहर! शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण
1

Ahilyanagar News: कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाला सोनेरी बहर! शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण

Ahilyanagar News: बिबट्यांच्या हालचालींवर आता AI ची नजर! वनविभागातर्फे खास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
2

Ahilyanagar News: बिबट्यांच्या हालचालींवर आता AI ची नजर! वनविभागातर्फे खास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Ahilyanagar News: …तर रास्ता रोको आंदोलन करू! संगमनेरमधील मुख्याधिकाऱ्यांना थेट देण्यात आला इशारा
3

Ahilyanagar News: …तर रास्ता रोको आंदोलन करू! संगमनेरमधील मुख्याधिकाऱ्यांना थेट देण्यात आला इशारा

अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी
4

अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.