Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक

Wai News: वाई तालुक्यातील बावधन गावाने फटाकेमुक्त बेंदूर साजरा करत आदर्श निर्माण केला. मात्र, मिरवणुकीनंतर सूरज काका कदम यांच्या 'बारका सोन्या' बैलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 27, 2026 | 08:59 PM
Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक
Follow Us
Follow Us:
  • बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर!
  • पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक
  • मात्र मिरवणुकीनंतर ‘बारका सोन्या’चा हृदयविकाराने दुर्दैवी अंत!
वाई : बावधन गावाला खिलार बैलांचा पारंपरिक वारसा आहे. येथील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथाच्या रथयात्रेच्या निमित्ताने लाखो रुपयांची बैलांची खरेदी होत असते. तसेच येथील बैलपोळा देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. सालाबातप्रमाणे यावर्षी देखील येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक वाद्याच्या तालात, गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण करत फटाकेमुक्त बेंदूर साजरा केला. हा बेंदूर संपूर्ण तालुक्यासाठी आदर्शवत ठरला आहे.

प्रत्येक शेतकरी आपल्या घरी असणाऱ्या बैलांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे देखभाल करत असतात. वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन त्याला शेतीतील कामासाठी साथ देणारा एक प्रामाणिक साथीदार म्हणून बैलाकडे पहिले जाते. याचे ऋण म्हणून शेतकरी वर्षातून एकदा आपल्या बैलांची गावातून शाही मिरवणूक काढत असतात. यावेळी वर्षभर शेतात काम करून खाद्यावर औत ओढून खांदे थकले जातात त्यामुळे बेंदूर सणाच्या आदल्या दिवशी हळद, तेलाने बैलाची खांदमळणी केली जाते.

दुसऱ्या दिवशी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घातली जाते. त्यानंतर त्यांच्या शिंगणा रंगरंगोटी करून सुंदर अशा शेंब्या परिधान केल्या जातात, नवीन दोर, म्होरक्या घालून त्यावर गुलालाची उधळण केली जाते. त्यानंतर पारंपरिक वाड्याच्या सहाय्याने संपूर्ण गावातून त्याची शाही मिरवणूक काढली जाते. त्यानंतर घरी आणून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.

वाई तालुक्यात FDAच्या कारवायांचा दिखावा की खरोखरची धडक मोहीम? जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह!

हा बैलपोळा पाहण्यासाठी कर्नाटक, पुणे, तसेच राज्यातील विविध ठिकाणाहून हजारो बेलप्रेमी येत असतात. यावेळी फटाके फटाके लावल्याने अनेक बैल सैरावैरा धावत असतात यातून आलेल्या बेलप्रेमीन कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी मागील दोन वर्षापासून फटाकेमुक्त बेंदूर साजरा करण्याचा निर्णय येथील बैलमलकानी घेतला आहे. हा एक आदर्शवत निर्णय असल्याने संपूर्ण तालुक्यात हा एक आदर्श बेंदूर म्हणून पाहील जाते.

सूरज काका कदम यांच्या बैलाचे आज दुर्दैवी निधन झाल्याने बावधन गावावर शोककळा पसरली. सूरज काका आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम करतात. त्यांच्या दावणीला ५ बैल आहेत. मोठा सोन्या, रामा, खंड्या, बलमा आणि बारका सोन्या..अशी ५ बैल आहेत. बगाड यात्राकाळात काका कदम यांच्या घरासमोर मोठी सजावट करून बैल बांधले जातात. सकाळी काका कदम यांनी आपल्या ५ बैलांना अंघोळ घालून आकर्षक पध्दतीने सजविण्यात आले. पारंपरिक वाद्यांसह बैलांची मिरवणूक काढण्यात आली. भैरवनाथ मंदिरातील मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर घरी जाताना बारक्या सोन्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. यामुळे काका कदम यांच्या कुटुंब, संपूर्ण खिलार प्रेमी, आणि बावधन गावावर शोककळा पसरली.

वाई-पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प

Web Title: Firecracker free bendur at bavdhan a grand procession of thousands of bullocks from a traditional wada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
2

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
3

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
4

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.