धाराशिव : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्तायात सोनारी येथे धनंजय सावंत यांच्याघरासमोर हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या काही अज्ञातांनी त्यांच्या घरासमोर गोळीबार केला. असा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाने केला आहे. या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल कऱण्यात आली असून घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धनंजय सावंत यांच्या बंगल्यासमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बंदुकीतून तीन फायर केले. यावेळी धनंजय सावंत घरात होते. तर त्यांचे सुरक्षा रक्षक घराबाहेर होते. या गोळीबारात कोणालाही इजा झाली नाही. पण गोळीबार कुणी आणि का केला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोरआलेली नाही. पण या घटनेनंतर धनंजय सावंत यांनी आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: तळहातावर जीवनरेषा कुठे असते? जीवनरेषेशी संबंधित हे 5 रहस्य जाणून घ्या
दरम्य़ान दोन दिवसांपूर्वी खंडेश्वरी प्रकल्प पूजनाच्या वेळी ठाकरे गट, शरद पवार गटा आणि धनंजय सावंत गटात काही कारणास्तव मोठा वाद झाला होता. या गोळीबारामागे या वादाचे कारण असू शकते, अशीही चर्चा परिसरातून होत आहे. पण सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस तपासात हा गोळीबार कुणी आणि का केला, कुणाच्या आदेशाने कऱण्यात आला का, हे निश्चित होईल. तसेच पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतील, असा विश्वासही धनंजय सावंत यांनी व्यक्त केला आहे.