Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: मंत्री लोढांचा जनता दरबार ठरतोय आदर्श; भाजपा कार्यालयात 500 नागरिकांनी…

कौशल्य विकास विभाग तसेच मुंबई उपनगर जिल्हा सह पालकमंत्री असलेल्या मंत्री लोढा यांनी जनता दरबाराच्या निमित्ताने विविध 12 विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2025 | 07:06 PM
Mangal Prabhat Lodha: मंत्री लोढांचा जनता दरबार ठरतोय आदर्श; भाजपा कार्यालयात 500 नागरिकांनी…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकाच छताखाली उपलब्ध राहून, नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्याच्या हेतूने थेट प्रशासकीय मदत मिळवून देणारा जनता दरबार आयोजित करून कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या या जनता दरबारात महाराष्ट्रातील सुमारे 500 नागरिकांनी आपले प्रश्न मांडले.

राज्य सरकारकडून विविध ठिकाणी मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित केले जातात. मात्र कौशल्य विकास विभाग तसेच मुंबई उपनगर जिल्हा सह पालकमंत्री असलेल्या मंत्री लोढा यांनी जनता दरबाराच्या निमित्ताने विविध 12 विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणले. यात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. रस्ते, पाणी, वीज आणि मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात असलेल्या जमिनींच्या प्रश्नासंदर्भात ही नागरिकांनी याठिकाणी आपले प्रश्न मांडले.

सी पी टँक इथे राहणारे जोतिंद्र आणि मीनाक्षी लोटवाल या वृध्द दांपत्याने देखील मंत्री लोढा यांचे आभार व्यक्त केले. मागील अनेक दिवस त्यांच्या घराजवळील गतिरोधकाचा प्रश्न सुटत नव्हता. मात्र या जनता दरबारात एकच वेळी मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएचे अधिकारी उपलब्ध झाल्याने हा प्रश्न निकाली निघाला असल्याचे लोटवाल यांनी सांगितले. तसेच मुलुंड येथे राहणारी क्रिशा कोठारी या विद्यार्थीनीचा उच्च शिक्षणाच्या प्रवेशाचा प्रश्न ही मार्गी लागला असल्याचे जतिन चंदे या नातेवाईकाने सांगितले.

Mangal Prabhat Lodha: औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांसाठी मंत्री मंगल प्रभात लोढांचा महत्वाचा निर्णय

मंत्री लोढा यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमाने ऐकून घेतले व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. “जनतेशी थेट संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. लोकांच्या समस्या केवळ कागदावर न राहता, त्या त्वरित मार्गी लागल्या पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे,” असे लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद पाहून लोढा यांचे अभिनंदन केले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री लोढा यांनी फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राचा दौरा करावा असे मत व्यक्त केले. दरम्यान, एकाच वेळी एकाच ठिकाणी विविध विभागातील अधिकारी वर्ग उपलब्ध झाल्यामुळे समस्या मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांसाठी मंत्री मंगल प्रभात लोढांचा महत्वाचा निर्णय

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे असे लेखी निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना दिले. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी तासिका निदेशकांना नियमित करण्याबाबत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती. यानंतर लोढा यांनी पत्राची तातडीने दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Five hundred people visit janta darbar at bjp office minister mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 07:06 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन
1

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन

BMC Election Result 2026: दक्षिण मुंबईत लोढांचा ‘मलबार हिल’ गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि ‘उबाठा’चा धुव्वा
2

BMC Election Result 2026: दक्षिण मुंबईत लोढांचा ‘मलबार हिल’ गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि ‘उबाठा’चा धुव्वा

पक्ष्यांच्या भरारीला नायलॉन मांजाचा लगाम! संक्रांतीत पतंगबाजीत ७२ पक्षी जखमी १० पक्षी रुग्णालयात दाखल
3

पक्ष्यांच्या भरारीला नायलॉन मांजाचा लगाम! संक्रांतीत पतंगबाजीत ७२ पक्षी जखमी १० पक्षी रुग्णालयात दाखल

“मुख्यमंत्री फडणवीसांच्या मार्गदर्शनात…”; विविध देशांमधील रोजगाराबाबत काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
4

“मुख्यमंत्री फडणवीसांच्या मार्गदर्शनात…”; विविध देशांमधील रोजगाराबाबत काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.