Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: लोकल प्रवासावर हिंसाचाराचे सावट! किरकोळ संभाषणही सहन होईना, समाज पोहोचला ‘टिपिंग पॉइंट’ वर

धावत्या लोकलमध्ये हाणामारी आणि खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. किरकोळ वादातून भांडणाची झालेली सुरुवात हिंसाचारात झाल्यामुळे जानेवारी २०२४ पासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर नऊ घटनांची नोंद करण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 18, 2026 | 11:00 AM
लोकल प्रवासावर हिंसाचाराचे सावट! किरकोळ संभाषणही सहन होईना, समाज पोहोचला 'टिपिंग पॉइंट' वर

लोकल प्रवासावर हिंसाचाराचे सावट! किरकोळ संभाषणही सहन होईना, समाज पोहोचला 'टिपिंग पॉइंट' वर

Follow Us
Follow Us:

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेचा प्रवास आता अधिक असुरक्षित होत चालला आहे. धावत्या लोकलमध्ये प्राध्यापकांवर झालेला जीवघेणा हल्ला आणि मयंक लोहार हत्या प्रकरण ताजे असतानाच, बुधवारी रात्री नऊ वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत अवघ्या १२ तासांत उपनगरीय रेल्वेत चार धक्कादायक घटना घडल्या. या सर्वांची सुरुवात किरकोळ वादातून झाली आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. जानेवारी २०२४ पासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अशा प्रकारच्या नऊ घटना नोंदवण्यात आल्या आहेत.(फोटो सौजन्य – AI)

मुंबईत वृक्षांचे होणार शास्त्रीय सर्वेक्षण! धोकादायक झाडांची होणार स्वतंत्र नोंद; विविध श्रेणींमध्ये केले जाणार वर्गीकरण

मुंबईची उपनगरीय रेल्वे दररोज ७५ लाख ते ८० लाख प्रवाशांची वाहतूक करते. गर्दीच्या वेळी गाड्या नेहमीच त्यांच्या निर्धारित क्षमतेपेक्षा खूप जास्त धावतात. ज्यामुळे प्रवासी डब्यांमध्ये खांद्याला खांदा लावून आणि दरवाजांना लटकून बसलेले असतात. वेगवान जीवनशैली, कायद्याबद्दलचा कमी झालेला धाक यामुळे समाज एका निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे’ मत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हमीद दाभोलकर व्यक्त केले आहे. आज प्रत्येकाला घाई आहे. शांतपणे थांबून काम करण्याची क्षमता कमी झाली आहे. जे आहे ते अपुरे वाटते. वाहतूक कोंडी, ताणतणाव, असमाधान आणि अधिक मिळवण्याची हाव यामुळे किरकोळ संभाषणाचेही लगेच वादात रुपांतर होते. समाजात ‘कितीही मिळाले तरी पुरेसे नाही’ ही मानसिकता तयार झाली आहे, असे डॉ. दाभोलकर म्हणाले.

एलीट वर्गही सुटला नाही

जागतिकीकरणामुळे निम्न मध्यम वर्गातून उच्च-मध्यम वर्गात गेलेल्या लोकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे टीका सहन करण्याची क्षमताही कमी झाली आहे. एसी, फस्ट क्लास डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांमध्येही हाणामारीच्या घटना समोर येत असल्याचे चित्र आहे. ही समस्या केवळ सर्वसामान्य वर्गापुरती मर्यादित नाही. फर्स्ट क्लास आणि एसी लोकलसारख्या ‘एलीट’ डब्यांमध्येही अशा घटना वाढल्या आहेत. अलीकडील एका घटनेत पीडित प्रथम श्रेणीचा प्रवासी होता.

लोकलमधील हिंसाचाराच्या घटनांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहता येणार नाहीचा हा प्रसन जाणाना चाहता आरोग्याचा इशारा आहे, डॉ. दाभोलकर म्हणाले. त्यांच्या मते, सततची धावपळ, आर्थिक ताण, स्पर्धा, गर्दी, प्रवासाचा तणाव आणि संयमाचा अभाव यामुळे लोकांची भावनिक सहनशक्ती कमी होत आहे. त्यामुळे पूर्वी दुर्लक्ष करून पुढे जाता आले असते असे किरकोळ वाद आता काही क्षणांत शिवीगाळ, किंवा जीवघेण्या हिंसाचारात बदलत आहेत. समाजात कायद्याचा धाक कमी होण्याबरोबरच दुसऱ्याच्य मताचा स्वीकार करण्याची आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता घटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बोटांचे ठसे जुळत नसल्याने ज्येष्ठांना मिळेना एसटीचे NCMC कार्ड; पर्यायी व्यवस्थाही नसल्याने अडचणींत वाढ

आम्ही प्रवाशांना प्रवासादरम्यान संयम राखण्याचे आवाहन 66 करतो. अशा कोणत्याही घटनेची माहिती मिळाल्यास सहप्रवाशांनी त्वरित रेल्वे प्रशासनाला कळवावे, जेणेकरून वेळेवर मदत आणि कार्यवाही करता येईल, अशी माहिती डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे. मुंबई लोकल ट्रेनमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Violence casts a shadow over mumbai local travel even casual conversations trigger clashes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Local train Mumbai
  • Mumbai News
  • Mumbai Train

संबंधित बातम्या

Western Railway Update: विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन लोकलचा बोरीवलीला ‘नो हॉल्ट’
1

Western Railway Update: विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन लोकलचा बोरीवलीला ‘नो हॉल्ट’

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
2

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
3

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

दृष्टिहीन गोविंदांच्या जिद्दीला सलाम! दहीहंडी पथकांना लाखोंचे प्रोत्साहन; हिंदू प्राण प्रतिष्ठानच्या वतीने शिबिराचे आयोजन
4

दृष्टिहीन गोविंदांच्या जिद्दीला सलाम! दहीहंडी पथकांना लाखोंचे प्रोत्साहन; हिंदू प्राण प्रतिष्ठानच्या वतीने शिबिराचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.