Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरीच्या वारीत यंदा ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ची एंट्री! मोबाईल प्रयोगशाळा; संशयित अन्नपदार्थांचा २४ तासांत निकाल, कारवाईही तत्काळ

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्याचीही चर्चा रंगू लागली आहे. पंढरपूर आणि आषाढी वारीशी विशेष भावनिक नाते आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पंढरपूर यात्रेच्या नियोजनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2026 | 10:42 AM
पंढरीच्या वारीत यंदा 'फूड सेफ्टी ऑन व्हील्स'ची एंट्री! मोबाईल प्रयोगशाळा; संशयित अन्नपदार्थांचा २४ तासांत निकाल

पंढरीच्या वारीत यंदा 'फूड सेफ्टी ऑन व्हील्स'ची एंट्री! मोबाईल प्रयोगशाळा; संशयित अन्नपदार्थांचा २४ तासांत निकाल

Follow Us
Follow Us:

आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे येत असताना त्यांच्या ताटात शुद्ध, सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न पोहोचावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने यंदा अत्याधुनिक पाऊल उचलले आहे. पालखी सोहळ्यासोबत ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ ही अत्याधुनिक मोबाईल प्रयोगशाळा तैनात करण्यात आली असून, संशयित अन्नपदार्थाची तपासणी करून अवघ्या एका दिवसात अधिकृत अहवाल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भेसळखोरांवर तत्काळ कारवाई करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय

आहे. आषाढी वारीदरम्यान लाखो भाविकांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील एकूण २० अन्न सुरक्षा अधिकारी वारीदरम्यान कार्यरत राहणार आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ९, तर इतर तीन जिल्ह्यांतील ११ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या मोबाईल प्रयोगशाळेमुळे अन्नपदार्थांचे नमुने घटनास्थळीच तपासले जाणार आहेत. प्रयोगशाळेच्या दर्जाचा अहवाल अल्पावधीत उपलब्ध होत असल्याने भेसळ सिद्ध झाल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.

कधीही तक्रार करा; प्रशासन तत्काळ पोहोचणार

भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूषित पाणी किंवा निकृष्ट खाद्यपदार्थ आढळल्यास नागरिक आणि वारकऱ्यांनी तातडीने अन्न प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. पालखीसोबत असलेली ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ व्हॅन सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहे. त्यामुळे संशयित अन्नपदार्थांचे निदान तातडीने होईल. वारीसाठी २० अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असून, नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

NCP Politics: पार्थ दादांचे राजकीय करिअर संपवण्याचा कट…! राष्ट्रवादीत लेटरबॉम्ब

वारीत आयुक्त तुकाराम मुंढे येण्याची शक्यता

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्याचीही चर्चा रंगू लागली आहे. पंढरपूर आणि आषाढी वारीशी विशेष भावनिक नाते आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पंढरपूर यात्रेच्या नियोजनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. वारकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या ६५ एकर वारकरी क्षेत्राच्या विकासाला गती देत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय सुरक्षित व सुलभ दर्शन व्यवस्था, यासाठी त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यकाळात आषाढी वारीच्या व्यवस्थापनात शिस्त, नियोजन आणि पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला होता. आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून ते पुन्हा आषाढी वारीत सहभागी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Food safety on wheels makes its debut at this years pandhari wari a mobile laboratory offering results on suspected food items within 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari
  • Ashadhi Wari Sohla

संबंधित बातम्या

Maharashtra News: ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा
1

Maharashtra News: ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

Ashadhi Wari 2026: वारीत पाय लागल्यानंतर ‘माऊली, चला पुढे’ का म्हणतात? जाणून घ्या वारकरी परंपरेचे तत्त्वज्ञान
2

Ashadhi Wari 2026: वारीत पाय लागल्यानंतर ‘माऊली, चला पुढे’ का म्हणतात? जाणून घ्या वारकरी परंपरेचे तत्त्वज्ञान

Ashadhi Wari 2026: वारकरी गोपीचंदन का लावतात, जाणून घ्या त्यामागील कारणे
3

Ashadhi Wari 2026: वारकरी गोपीचंदन का लावतात, जाणून घ्या त्यामागील कारणे

साबुदाणा खाऊन ॲसिडिटी होते? मग आषाढी एकादशीच्या उपवासाला खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, पचायला हलके
4

साबुदाणा खाऊन ॲसिडिटी होते? मग आषाढी एकादशीच्या उपवासाला खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, पचायला हलके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.