Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; माजी मंत्री, माजी आमदार करणार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

या सर्व नेत्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा येत्या ३ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. या निर्णयाची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 30, 2025 | 09:37 AM
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; माजी मंत्री, माजी आमदार करणार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर   काही दिवसांत राज्याच्या राजकारणात झपाट्याने घडामोडी घडत आहेत.  त्यामुळे विविध राजकीय पक्षांमध्ये नेते येणे-जाणे सुरू झाले आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नुकताच मोठा झटका बसला, कारण माजी महापौर दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, आता जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षासाठीही आव्हान निर्माण होणार आहे. या भागातील काही प्रमुख नेते, माजी मंत्री आणि माजी आमदार लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन माजी मंत्री, तीन माजी आमदार आणि महिला प्रदेश सरचिटणीस लवकरच अजित पवार यांच्या गटात सामील होणार आहेत. या नेत्यांमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, अमळनेर येथील महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, तसेच माजी आमदार दिलीप सोनवणे आणि दिलीप वाघ यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक कार्यकर्तेही नव्या गटात प्रवेश करणार आहेत.

Pahalgam Terror Attack: ‘पुढील 24 तासांत हल्ला होईल…. ‘ पाकचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांचे खळबळजनक विधान

३ मे रोजी मुंबईत पक्षप्रवेश सोहळा

या सर्व नेत्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा येत्या ३ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. या निर्णयाची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

अलीकडच्या काळात महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीच्या पक्षांकडे वळताना दिसत आहेत. यामुळे आघाडीतील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांना याच पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी उद्धव ठाकरे यांचा साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दळवी हे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक मानले जात होते. त्यांनी सामान्य शिवसैनिक म्हणून राजकारणात पाऊल ठेवले होते आणि आज दक्षिण मुंबईतील एक प्रभावशाली नेता म्हणून ओळखले जातात.

रायगडसह नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर मिटला? रायगडात तटकरे तर नाशिकमध्ये महाजन करणार झेंडावंदन

Web Title: Former minister and former mla from sharad pawars ncp will join ajit pawars party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
1

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
2

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
3

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
4

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.