Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, मावळ तालुक्याचे सुपुत्र, मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी महसूल व परिवहन राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे सोमवारी (दि. १४) वयाच्या ८५ व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2026 | 04:51 PM
माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, मावळ तालुक्याचे सुपुत्र, मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी महसूल व परिवहन राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे सोमवारी (दि. १४) वयाच्या ८५ व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ॲड. मदन बाफना यांची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रदीर्घ आणि प्रभावी राहिली.

 

१९६७ मध्ये एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिलीबरोबरच सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मैत्री झाली. पुढे ही मैत्री राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घ सहकार्यामध्ये रूपांतरित झाली. बाफना यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली. त्यांनी मावळ तालुका काँग्रेस कमिटी तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९७७ मध्ये पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले.

मावळचे दोनदा आमदार, दोनदा मंत्री

मावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी १९८५ आणि १९९० मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. अशा प्रकारे त्यांनी मावळचे दोनदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. आमदारकीच्या काळात त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी महसूल राज्यमंत्री तसेच परिवहन राज्यमंत्री म्हणून काम केले. महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी जमीनविषयक प्रश्न आणि महसूल प्रशासनाशी संबंधित बाबींवर विशेष लक्ष दिले. मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत शरद पवारांसोबत

सन १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, त्यावेळी ॲड. मदन बाफना हे पवारांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शरद पवार यांचे विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणून त्यांची राजकीय क्षेत्रात ओळख होती.

हे सुद्धा वाचा : पारंपारिक शेतीपेक्षा उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज, तरच…; शरद पवारांनी मांडले मत

शैक्षणिक क्षेत्रातही ठसा

राजकारणासोबतच ॲड. मदन बाफना यांनी शिक्षण क्षेत्रातही भरीव योगदान दिले. वडगाव येथील संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. मावळ आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू आणि प्रशासनाची जाण असलेले ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ॲड. मदन बाफना यांचा आदर होता. कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी घेतलेली भूमिका यामुळे त्यांचे मावळच्या जनमानसाशी घट्ट नाते निर्माण झाले होते. त्यांच्या निधनाने मावळने अनुभवी राजकीय नेतृत्व, सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे.

Web Title: Former minister of state for revenue adv madan bafna has passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Death
  • maharashtra
  • maval news

संबंधित बातम्या

Actor Giri Babu: कलाविश्वावर शोककळा! चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; 600 हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
1

Actor Giri Babu: कलाविश्वावर शोककळा! चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; 600 हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
2

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी
3

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी

३५व्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाबळेश्वरमध्ये बालचमूंच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती
4

३५व्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाबळेश्वरमध्ये बालचमूंच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.