"समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प",नरेंद्र पवारांचे आवाहन
डोंबिवली: समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहचवण्याचा भाजपचा हा प्रामाणिक प्रयत्न असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित येणारे सेवा पंधरवडा अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यात यावे असे आवाहन कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभियानाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत कल्याण जिल्हा भाजपची कार्यशाळा संपन्न झाली. त्यामध्ये उपस्थित भाजप पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधताना पवार यांनी हे आवाहन केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती म्हणजेच २ ऑक्टोबर दरम्यान भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवडा २०२५ साजरा करण्यात येणार आहे. या सेवा पंधरवड्यात विविध लोककल्याणकारी उपक्रम आयोजित करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे नुकतीच कल्याण जिल्हा कार्यशाळा संपन्न झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या अभियानाअंतर्गत रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, दिव्यांग व्यक्ती सन्मान आणि उपकरण वितरण, “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण, भूतपूर्व कार्यकर्त्यांचा सन्मान, कार्यकर्त्यांच्या घरी भोजन, “वोकल फॉर लोकल” उपक्रम, स्थानिक मेळावे आणि “मोदी विकास मॅरेथॉन” अशा विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तर आपण सर्वांनी या अभियानात सक्रियपणे सहभागी होऊन समाजसेवेची ही चळवळ अधिक व्यापक करण्याची अपेक्षा व्यक्त करत हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही पवार यांनी केले.
या कार्यशाळेस भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब, अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे तसेच कल्याण जिल्हामधील सर्व मंडल अध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यशाळेत सेवा पंधरवड्याच्या काळात राबविण्यात येणारे उपक्रम तसेच वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे या विविध लोककल्याणकारी उपक्रमांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकावर सर्वसामान्य लोकांसाठी ” मोफत वाचनालय ” सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
Navi Mumbai : NMT कडून प्रवाशांची अडवणूक; पनवेल रेल्वे स्थानक मार्गावर प्रवाशांची गैरसोय