Sanjay Pandey: माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीने जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत जागांचा आढावा घेतला जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमुळे अनेक जणांचे निवडणूक लढवण्याची स्वप्न पूर्ण होऊ शकत नसल्याने, त्यांनी आधीच दुसऱ्या पक्षात जायला सुरूवात केली आहे. दरम्यान आता आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. संजय पांडे हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
संजय पांडे हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे हे चर्चेत आले होते. ईडीने संजय पांडे यांच्याविरुद्ध खटला देखील दाखल केला आहे. संजय पांडे मुंबईतील वर्सोवा किंवा अंधेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. उमेदवारीचा शब्द दिल्यानंतर संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची शक्यता आहे.
मी निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे असे संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितले. यासंदर्भात पक्ष निर्णय घेईल. मी ईडी आणि सीबीआयचा व्हिक्टिम आहे. या संदर्भात मी कोर्टात केस लढेन. या प्रकरणाचा आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा काहीही संबंध नाही. २००४ पासून मला काँग्रेस पक्षात काम करायचे होते. मात्र आता वेळ आहे म्हणून मी काम करत आहे.
I am glad to welcome former DGP of Maharashtra and former CP of Mumbai Sanjay Pandey ji to the Congress family today. His integrity and dedication to upholding justice, even when facing politically motivated charges by BJP, reflect the core values we stand for.
Throughout his… pic.twitter.com/uvS1W4yrOs
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 19, 2024
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली होती. संजय पांडे यांच्या ISEC या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून फोन टॅप केल्याचा आरोप ईडी आणि सीबीआयने केला होता. याच प्रकरणात मूंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली होती.