Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेबसाईटवरून वधू शोधणं पडलं महागात; महिलेने अविवाहित असल्याचं भासवलं अन् नंतर…

रवि वाधवाणी हे खासगी नोकरी करताना लग्न लावून देणाऱ्या एका वेबसाईटवर त्यांची ओळख रंजिता पितांबर छाबरिया हिच्याशी झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 10, 2025 | 12:59 PM
वृद्धाला जाळ्यात ओढून घेतले पैसे

वृद्धाला जाळ्यात ओढून घेतले पैसे

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न केले. दुसऱ्या पतीच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन सेटलमेंटच्या नावाखाली 50 लाख रूपयांची मागणी केली. खोटा विवाह करून फसवणूक करणाऱ्या पत्नीचे नाव रंजिता पितांबर छाबरिया (वय 47, रा. श्री काकायाप्पा लेआऊट बंगळुरू) असे आहे.

रंजिता छाबरिया आणि तिचा मामा संजय मखिजा (वय 52, रा. शिवाजीनगर, सिकंदराबाद) यांनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणात रवि वासुदेव वाधवाणी (वय ४९, रा. ऑगस्ट होमजवळ, गारखेडा परिसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवि वाधवाणी हे खासगी नोकरी करताना लग्न लावून देणाऱ्या एका वेबसाईटवर त्यांची ओळख रंजिता पितांबर छाबरिया हिच्याशी झाली. तिने वेबसाईटवर दिलेल्या माहितीत ती अविवाहित असल्याचे सांगण्यात आले. तिच्यासोबत लग्नासाठी बोलणी सुरू झाली.

दरम्यान, दोघांनी ओळख वाढल्यानंतर दोघांच्या सहमतीने 7 जुन 2023 दोघांनीही मंदिरात लग्न केले. यावेळी रवि वाधवानी यांचा परिवार आणि रंजिता छाबरिया यांचाही परिवार उपस्थिती होता. लग्नात रवि वाधवानी यांनी रंजिता हिच्या अंगावर पंधरा लाखांचे दागिन्यांसह लग्नाचा खर्चही केला. लग्नानंतर रंजिता ही रविसोबत राहिली नाही. रवि हे बंगळुरूहून छत्रपती कामानिमित्त आले.

संभाजीनगर शहरात रंजिता ही बंगळुरूतच थांबली. दरम्यान, रंजिता ही संशयास्पद वागत असल्याने रवि वाधवानी यांनी बंगळुरू येथे रंजिताच्या आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांकडून माहिती घेतली असता रंजिताचा अगोदरच विवाह झाल्याची माहिती मिळाली. तसेच रंजिता हिच्या पीएफ खात्याची माहिती घेतली असता, तिचा वर्ष २०१३-१४ च्या दरम्यान विवाहित असल्याची माहिती समोर आली.

परस्पर दिली खोटी तक्रार

लग्न झाल्यानंतर रंजिता ही तिच्या मामाकडे राहण्यासाठी काही दिवस गेली होती. यानंतर वारंवार रवि वाधवानी याने तिला सोबत घरी येण्याचे सांगितले. तिने वारंवार टाळाटाळ केली. रवि वाधवानी हे संभाजीनगरमध्ये असताना रंजिता हिने पोलिस ठाणे गाठून तिला नांदवत नाही. लग्न करून सोडून दिले अशी तक्रार दिली. याप्रकरणी रवि वाधवानी यांच्या तक्रारीवरून रंजिता पितांबर छाबरिया हिच्यासह संजय मखिजा या दोघांच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fraud with man in fake promise of marriage incident in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • crime news
  • Sambhajinagar Crime

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.