Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

G-20 शिखर परिषदेच्या पौष्टिक तृणधान्य प्रदर्शनात, रायगडच्या महिलांचा सहभाग, सत्काराचा मान रायगड जिल्ह्याला

अनिता योगेश माळगे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान यांच्या पत्नीं अक्षता ऋषी सुनुक, इटली प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांचे स्वागत सत्कार केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 16, 2023 | 03:22 PM
G-20 शिखर परिषदेच्या पौष्टिक तृणधान्य प्रदर्शनात, रायगडच्या महिलांचा सहभाग, सत्काराचा मान रायगड जिल्ह्याला
Follow Us
Close
Follow Us:

रायगड : जी-व्टेंन्टी शिखर परिषद नवी दिल्ली येथे ९ सप्टेंबर २०२३ रोजी पौष्टिक तृण धान्य प्रदर्शनामध्ये जगभरातील अनेक महत्वाच्या देशांच्या पंतप्रधान अथवा अध्यक्ष यांच्या पत्नीने भेट दिले. याप्रसंगी त्यांचा सत्काराचा मान रायगड जिल्ह्यातील महिलांना मिळाला. यामध्ये साऊथ कोरिया पंतप्रधानांची पत्नी युन सिक व फ्रान्सचे प्रधानमंत्री मॅक्रॉन इमानुल यांच्या पत्नींचे सत्कार रायगड जिल्ह्यातील भारती कातकरी यांनी केले. यासह अनिता योगेश माळगे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान यांच्या पत्नीं अक्षता ऋषी सुनुक, इटली प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांचे स्वागत सत्कार केले.

या प्रदर्शनामध्ये देशभरातील अनेक राज्यातून तृण धान्य लागवड करणारे शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, कृषी अधिकारी, कृषी व संलग्न विषयाची विद्यापीठे व संस्था यांचा लक्षणीय सहभाग होता. तसेच केंद्रीय मसाला पिके संशोधन संस्था, राष्ट्रीय दूध विकास संस्था – कर्नाटक, राष्ट्रीय पुष्प उत्पादन संस्था पुणे व भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली अशा राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या संस्था व त्यांनी संशोधन केलेल्या तंत्रज्ञान व संशोधनाची, कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा व हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा वेगवेगळ्या स्टॉलची मांडणी केली होती .

जी-व्टेंन्टी शिखर परिषद नवी दिल्ली येथे विविध देशांच्या राष्ट्र प्रमुखांसह पाचशे नामांकित व्यक्ती, उद्योगपती यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दोन महिलांना मिळाली. रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील नढाळवाडी गावच्या श्रीमती भारती दिलीप कातकरी यांनी विविध प्रकारच्या लाडवांचा स्टॉल लावला होता. यामध्ये नाचणी लाडू, बेसन लाडू, रवा लाडू अशा पौष्टीक लाडवांचा समावेश होता. याप्रसंगी साऊथ कोरिया पंतप्रधान यांची पत्नी युन सिक व फ्रान्सचे प्रधानमंत्री मॅक्रॉन इमानुल यांच्या पत्नींचे स्वागत सत्कारासाठी भारती कातकरी व अनिता योगेश माळगे यांची ब्रिटनचे पंतप्रधान यांच्या पत्नी, इटली प्रधानमंत्री यांची निवड झाल्याने रायगड जिल्ह्याचे नाव जी-व्टेंन्टी मध्ये पाहेाचले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्यातून या महिलांना जी-व्टेंन्टी शिखर परिषदमध्ये निवड व सहभागी होण्यापर्यंत कृषी अपर मुख्य सचिव अनुप कुमार, आयुक्त कृषी सुनील चव्हाण, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे, संचालक निविष्ठा व गुणनियंत्रक विकास पाटील, संचालक आत्मा दशरथ तांभाले, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर दत्तात्रय गावसाने, आत्मा प्रकल्प अधिकारी सोलापूर मदन मुकणे, वरिष्ठ शास्त्रज्ञ सोलापूर लालासाहेब तांबडे, नाबार्ड सोलापूर नितीन शेळके, प्रज्ञा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: G 20 summit delhi india governement of india narendra modi raigad bharti dilip katkari anita yogesh malge maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2023 | 11:39 AM

Topics:  

  • delhi
  • G-20 Summit
  • india
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • narendra modi

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
2

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
3

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
4

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.