मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथे असलेल्या नगरपालिकेच्या गाळ्याच्या पाठीमागे आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 2 लाख 40 हजार 970 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
बालाजी अशोक इंगळे (वय 33), प्रशांत मधुकर शिवशरण (वय 32), तानाजी नारायण घाटूळ (वय 60), बजरंग शिवाजी फडतरे (वय 55), किशोर विठ्ठल कसबे (वय 38, सर्व रा. मंगळवेढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोराळे नाका परिसरातील नगरपालिकेच्या गाळ्याच्या पाठीमागे आडोशाला मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांना मिळाली हाेती. त्यांनी पथकाच्या मदतीने दि. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी छापा टाकला. जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी 2 लाख 40 हजार 970 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान कारवाईत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.