Pune ganeshtsav 2024
पुणे : लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. पुण्यातील गणेशोत्सव देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. पुण्यातील मंडळाची विसर्जन मिरवणूक देखील दोन दिवस चालते. हा विलंब टाळण्यासाठी प्रशासन, पुणे पोलीस यांच्याकडून प्रयत्न चालू आहेत. तसेच गणेशोत्सवातून निसर्गाची हानी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गणेश मंडळांकडून ढोल ताशा पथक व डीजे लावले जातात. मात्र याबाबत नियम व अटी घालण्यात आले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने गणेशोत्सावातील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. डीजे आणि लेझर लाईटचे प्रमाण वाढत आहे. यासाठी डॉ. कल्याणी मांडके यांनी लवादाकडे याचिका दाखल केली होती. यामध्ये पुण्यात गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रतिवादी म्हणून राज्य सरकार, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महापालिका आणि पुणे पोलिसांना करण्यात आले होते. यावर राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने आदेश दिले आहेत.
काय आहेत नियम अन् अटी?
पुण्यातील गणेशोत्सव
येत्या ७ सप्टेंबर रोजी आपल्या गणपती बाप्पाचे आगमन घरोघरी होणार आहे. सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठा देखील सजल्या आहेत. पुण्यातील गणशोत्सवाला मोठी परंपरा आहे. पुणे शहरातील गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे भक्तांचे मोठे आकर्षण आहे. पुण्यातील गणेशोत्सवामध्ये आगमनाची आणि विसर्जनाची मोठ्या रांगा असतात. यामध्ये पुण्याचे पाच मानाचे गणपती असलेले पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, त्यानंतर तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती हे पाच मानाचे गणपती असतात. त्यानंतर इतर मंडळांचे गणपती असतात. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ, मंडई शारदा गणपती, भाऊसाहेब रंगारी अशा गणपतीची मिरवणूक देखील लक्षवेधी असते. यामध्ये ढोल ताशा पथक, पारंपारिक वाद्य पथक, मर्दानी खेळ आणि समाजोपयोगी संदेश देणारी पथकं असतात. मात्र एका गणपतीसाठी अनेक पथकं वादन करत असल्यामुळे मोठी रांग लागते. तसेच अनेकदा ही विसर्जन मिरवणूक लांबते. ती लांबू नये म्हणून पुणे पोलीस, प्रशासन आणि महानगर पालिका प्रयत्न करत आहेत.