Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganpati Festival 2024: काहीही करून गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत करा; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हा रास्ता लवकरात दुरुस्त करू शकतो आणि चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप आणि सुरक्षित करू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2024 | 09:49 PM
Ganpati festival 2024: काहीही करून गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत करा; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Ganpati festival 2024: काहीही करून गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत करा; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

लवकरच राज्यात आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. त्यासाठी हजारो चाकरमानी हे कोकणात आपल्या गावी जाणार आहेत. दरम्यान कोकणात जाणाऱ्या मुंबई -गोवा महामार्गाची ओळख ही खड्डेमय अशी झालेली आहे. दरम्यान गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची प्रलंबित कामांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान मुंबई-गोवा महार्गाच्या पाहणीसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. कोकणात जाणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी खड्डे लवकरात लवकर भरण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वतः फिल्डवर जात मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. जागोजागी असलेले खड्डे व ते बुजवण्यासाठी संबंधित विभागाला येत असलेल्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. त्यानंतर काहीही करून गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर आमदार भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.

महामार्गावरील खड्डे वेळेत न बुजवल्यास चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना त्रास होण्याची शक्यता आहे. गेली कित्येक वर्षे या महामार्गाचे काम रखडले आहे. मात्र पीडब्ल्यूडी अधिकारी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही हा रस्ता लवकरात लवकर नीट करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची दखल घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना संबंधित प्रशासकीय यंत्रणेला केली होती. त्यानुसार आज या महामार्गाचा मी स्वतः दौरा करून केलेल्या कामाची पाहणी केली. तसेच ३ सप्टेंबरपूर्वी हे खड्डे बुजवून येणाऱ्या… pic.twitter.com/SSHQnFQ2dT — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 26, 2024

गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हा रास्ता लवकरात दुरुस्त करू शकतो आणि चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप आणि सुरक्षित करू शकतो. ज्या लोकांनी चुकीचे काम केले आहे त्यामुळे आज हे भोगावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील लक्ष घातले आहे. तसेच महामार्गावरील त्रास पाहता ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title: Ganpati festival 2024 cm eknath shinde orders to repair mumbai goa highway before ganpati utsav at any cost 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 09:49 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ganeshotsav

संबंधित बातम्या

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
1

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Maharashtra Politics : महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? मुंबईचा महापौर कोणाचा? DCM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर
2

Maharashtra Politics : महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? मुंबईचा महापौर कोणाचा? DCM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर

Operation Lotus : ऑपरेशन लोटसने एकनाथ शिंदेंना केले बैचेन; भाजपचा हा राजकीय गेम?
3

Operation Lotus : ऑपरेशन लोटसने एकनाथ शिंदेंना केले बैचेन; भाजपचा हा राजकीय गेम?

dharmendra passed Away : अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; CM फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
4

dharmendra passed Away : अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; CM फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.