Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, AK47 घेत अजित पवारांची पुण्यात मिश्किल टिप्पणी

बैठक असो, सभा असो की पत्रकार परिषद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी स्पष्ट आणि मिश्किलपणेही बोलताना अनेकवेळा पाहिले आहे. त्यांच्या काही विधानांमुळे वादही निर्माण झाले होते.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 06, 2025 | 11:41 PM
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

Follow Us
Follow Us:

बैठक असो, सभा असो की पत्रकार परिषद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी स्पष्ट आणि मिश्किलपणेही बोलताना अनेकवेळा पाहिले आहे. त्यांच्या काही विधानांमुळे वादही निर्माण झाले होते. आता आज पुण्यातील चाकणमध्ये अजित पवारांनी केलेली एक मिश्किल टिप्पणी राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यानंतर त्यांनी चाकणच्या निबे उद्योग समूहाला भेट दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी हातामध्ये एके ४७ बंदूका घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवसी यांनी नेम लावण्याचा प्रयत्न केला. तर अजित पवारांनी उपस्थित पत्रकारांवर बंदूक रोखत “महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर बघा”, असे विधान केले अन् उपस्थितांमध्य एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले की, “आम्ही दोघं तर सगळ्यांना उडवून टाकू.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, “आता एवढंच छापतील.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण, पुणे येथे ‘निबे लिमिटेड’ प्रकल्पात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्र, व सरंक्षण सामग्रीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, निबे लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे, निबे… pic.twitter.com/xBEkM0w0VR — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2025

व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातात एके४७ घेतल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही दिसत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील चाकण येथे ‘निबे लिमिटेड’ प्रकल्पातील अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्र, व सरंक्षण सामग्रीची पाहणी केली. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, निबे लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे, निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि. चे संचालक प्रकाश भामरे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Give mahayuti news properly ajit pawar funny comment with ak47 in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 11:37 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devendra Fadnavis
  • Mahayuti Governmet

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
4

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.