Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीआधी 492 अवसायनातील दूध संस्थांच्या मतदानाच्या हक्काचा मुद्दा पुन्हा न्यायालयात पोहोचला आहे. श्रीराम दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात SLP दाखल केल्याने निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम होणार, याकडे कोल्हापूरचं लक्ष लागलं आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 12, 2026 | 08:40 PM
Gokul Milk

Gokul Milk

Follow Us
Follow Us:
  • गोकुळच्या 492 दूध संस्थांचा मतदानाचा हक्क पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
  • 15 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज; त्याआधीच नव्या न्यायालयीन लढाईला सुरुवात
  • 1400 पात्र दूध संस्थांचा ‘अदृश्य शक्ती’विरोधात एल्गार; निवडणुकीत कोणाला मतदान करणार?
 

Gokul Election : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी रंगात येत असतानाच आता पुन्हा एकदा न्यायालयीन वादाने डोकं वर काढलं आहे. अवसायनातील 492 दूध संस्थांना पात्र ठरवून अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे या 492 संस्थांचा मतदानाचा हक्क पुन्हा एकदा कोर्टाच्या कचाट्यात सापडला आहे.

इस्पुर्ली, ता. करवीर येथील श्रीराम दूध संस्थेचे सदस्य रजनीकांत चेंडके यांनी महाराष्ट्र शासन आणि सहकार विभागाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका म्हणजेच SLP दाखल केली आहे. विशेष म्हणजे, 15 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच ही याचिका दाखल झाल्याने गोकुळच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता

या याचिकेवर मंगळवारी सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

एक वर्षाची प्रतीक्षा संपली,वनतारातून नांदणी मठाकडे माधुरीची घरवापसी; आरोग्याच्या सूचनांसह परतीला मंजुरी

दरम्यान, 492 पात्र दूध संस्थांचा मतदानाचा हक्क कायम राहावा, यासाठी आमदार सतेज पाटील यांनी या संस्थांच्या बाजूने पुढाकार घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात संस्थांची बाजू मांडण्यासाठी ॲड. आनंद लांडगे हे न्यायालयात पक्ष मांडणार आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून गोकुळची निवडणूक विविध न्यायालयीन वादांमुळे लांबणीवर पडत असल्याचं चित्र आहे. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अर्ज भरण्याची वेळ तोंडावर आली आहे. अशातच 492 संस्थांचा मुद्दा पुन्हा कोर्टात गेल्याने निवडणुकीच्या गणितावर त्याचा काय परिणाम होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

1400 पात्र संस्थांचा ‘अदृश्य शक्ती’विरोधात एल्गार

दुसरीकडे, गोकुळच्या निवडणुकीत पात्र ठरलेल्या सुमारे 1400 दूध संस्थांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांत न्यायालयीन प्रक्रियेनंतर या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे.

दोन दिवसांपूर्वी या पात्र संस्थांकडून ‘सत्यविजय कृतज्ञता मेळावा’ घेण्यात आला. यावेळी निवडणुकीत संस्थांना अपात्र ठरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कथित ‘अदृश्य शक्ती’विरोधात एल्गार पुकारण्यात आला.

Gokul Milk Union Election 2026: कोणाची सत्ता येणार? ‘गोकुळ’च्या 25 जागांसाठी निवडणूक; 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला निकाल

या मेळाव्यात संबंधित संस्थांनी आगामी निवडणुकीत ‘अदृश्य शक्ती’ला मतदान न करण्याचा निर्णय एकमुखाने घेतल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे आता गोकुळच्या निवडणुकीत पात्र संस्थांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याची उत्सुकता वाढली आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयातील याचिका आणि दुसरीकडे पात्र संस्थांची आक्रमक भूमिका, यामुळे गोकुळची निवडणूक आता चांगलीच रंगण्याची चिन्हं आहेत.

Web Title: Gokul election 492 dairy societies voting right supreme court kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Gokul Milk
  • kolhapur news
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Madhuri Elephant Vantara To Kolhapur: ती पुन्हा आली…! 13 महिन्यांच्या लढ्यानंतर माधुरी हत्तीणीचे नांदणीत पुनरागमन
1

Madhuri Elephant Vantara To Kolhapur: ती पुन्हा आली…! 13 महिन्यांच्या लढ्यानंतर माधुरी हत्तीणीचे नांदणीत पुनरागमन

CJI On Executive Magistrate Notice: न्यायालयाचा आदेश डावलण्याचे धाडस कसे झाले? ५ लाखांच्या नोटिसीवरून सरन्यायाधीश सूर्यकांत भडकले
2

CJI On Executive Magistrate Notice: न्यायालयाचा आदेश डावलण्याचे धाडस कसे झाले? ५ लाखांच्या नोटिसीवरून सरन्यायाधीश सूर्यकांत भडकले

Supreme Court News: डॉक्टरांवरील हल्ल्यांवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक; राजकीय कार्यकर्त्यांवर कडक कारवाईचे आदेश
3

Supreme Court News: डॉक्टरांवरील हल्ल्यांवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक; राजकीय कार्यकर्त्यांवर कडक कारवाईचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.