
Rahul Gharat, Supreme Court, Palghar News, Doctor Attack, Crime News
सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी पालघर जिल्ह्यातील एका रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसोबत कथित मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आली आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पालघरमधील रिलीफ रुग्णालयात रविवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याच्या मुद्द्यावरून रुग्णालयाच्या परिसरात वाद सुरू झाला.
रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन सांखे, शहरप्रमुख राहुल घरत यांच्यासह काही जणांनी रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात प्रवेश करून डॉक्टरांशी वाद घातला. त्यानंतर काही कार्यकर्ते रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) जबरदस्तीने शिरल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
Maharashtra Civic Body Financial Rights: नगराध्यक्षांचे वित्तीय अधिकार रद्द; नगरविकास विभागाचा
या घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून, त्यात एक रिसेप्शनिस्ट मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी एका व्यक्तीने त्याला थप्पड मारल्याचा आरोप आहे. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला धमकावल्याचेही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी पालघर पोलिसांनी कारवाई करत किमान 17 जणांविरोधात FIR दाखल केली आहे. या आरोपींमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाशी संबंधित व्यक्तींचाही समावेश असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, डॉक्टरांवरील हल्ल्याची ही एकमेव घटना नसल्याचे समोर आले आहे. यापूर्वी कल्याणमधील एका महापालिका रुग्णालयात शिवसेनेच्या एका नगरसेवकाने डॉक्टरांसोबत मारहाण केल्याचा आरोप झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी रमेश म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णालयात सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी अशा घटनांवर कठोर कारवाईची गरज असल्याचे या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अधोरेखित झाले आहे.