Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: भंडारा जिल्ह्यात सोन्याच्या खाणी! किटाळी परिसरात सर्वेक्षणाला मिळणार गती; रोजगाराच्या संधीची शक्यता

किटाळी गाव परिसरातील १८० हेक्टर क्षेत्रात विविध धातूंच्या उपलब्धतेचे मूल्यांकन करण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला करार देण्यात आला आहे. ही कंपनी सर्वेक्षण करून राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 23, 2026 | 01:34 PM
भंडारा जिल्ह्यात सोन्याच्या खाणी! किटाळी परिसरात सर्वेक्षणाला मिळणार गती; रोजगाराच्या संधीची शक्यता

भंडारा जिल्ह्यात सोन्याच्या खाणी! किटाळी परिसरात सर्वेक्षणाला मिळणार गती; रोजगाराच्या संधीची शक्यता

Follow Us
Follow Us:

भंडारा जिल्ह्यात किटाळी परिसरात सोन्याची खाण व इतर मौल्यवान धातूंच्या प्रकल्पाबाबत मोठी आणि उत्कंठावर्धक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील भूगर्भात सोने, चांदी आणि तांबे यांसारखे मौल्यवान धातू असण्याची शक्यता भूगर्भशास्त्रज्ञांच्या विस्तृत संशोधनानंतर वर्तवली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या आढावा बैठकीत या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून, पावसाळ्यानंतर या सर्वेक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. १८० हेक्टर क्षेत्रात होणार खोदकाम जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील किटाळी व परिसरातील एकूण १८० हेक्टर जागेत हे सर्वेक्षण होणार आहे. हे धातू, शोधण्यासाठी हैदराबाद येथील ओरा इन्फ्रा कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. किटाळी परिसर बहुतांश जंगलव्याप्त असून, ही कंपनी संपूर्ण सर्वेक्षणाचे काम स्वतःच्या खचनि भूगर्भात अत्याधुनिक ड्रिलिंग मशीनच्या साहाय्याने करणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

Yavatmal News: अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शून्य? आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; मिठाई साठवणुकीची जुनीच पद्धत

ज्या १८० हेक्टर जमिनीचे सर्वेक्षण होणार आहे, ती जमीन वनविभाग, शासकीय आणि खासगी मालकीची आहे. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. किटाळी परिसरात वनविभागाचे दाट जंगल असून खाणीमुळे ते प्रभावीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भूगर्भात सोने, चांदी, तांबे किंवा इतर मौल्यवान धातू आहेत का, हे निश्चित करण्यासाठी जमिनीचे सखोल मूल्यांकन केले जाईल. त्या धातूंचे प्रमाण, ते काढण्याचा खर्च आणि ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल की नाही, या सर्व बाबींवर विचार केला जाणार आहे. नागपूर येथील खनिकर्म संचालनालयाकडून या कंपनीच्या कामावर विशेष देखरेख ठेवली जाणार आहे.

इतर खनिज संपत्ती देखील मुबलक प्रमाणात

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात आधीपासूनच मँगनीज मोठ्या प्रमाणात आढळते. यासोबतच लोहखनिज, क्रोमाइट, सिलिम्युनम, कोरंडम, फिरोफायलीट, कायनाइट आणि क्वार्ट्स ही खनिजेही जिल्ह्यात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात मंगनीज वीस दशलक्ष टन उपलब्ध असून, डोंगरी बुद्रुक, बाळापूर, सीतासावंगी, इंदूची येथील खार्णीमध्ये मँगनीजचे साठे आढळतात.

दुष्काळी यवतमाळात आढळला समृद्ध वारसा! दिग्रसनजीक उत्खननातून मिळाली ३ हजार वर्षापूवींची मानवी वस्ती

किटाळी गाव परिसरातील १८० हेक्टर क्षेत्रात विविध धातूंच्या उपलब्धतेचे मूल्यांकन करण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला करार देण्यात आला आहे. ही कंपनी सर्वेक्षण करून राज्य सरकारला अहवाल सादर करेल. किटाळी परिसरात सोने, चांदी आणि तांबे यांसारख्या धातूंच्या खाणी आढळल्यास जिल्ह्यात अनेक सकारात्मक बदल होऊन तरुणांसाठी रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील अशी शक्यता आहे, अशी माहिती सचिन वाढिवे यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Gold exploration set to accelerate in bhandaras kitali region job prospects expected to rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Gold
  • Gold mine
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान
1

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.