दुष्काळी यवतमाळात आढळला समृद्ध वारसा! दिग्रसनजीक उत्खननातून मिळाली ३ हजार वर्षापूवींची मानवी वस्ती
आज दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याचा ३ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास, समृद्ध शेती, विकसित वस्ती आणि प्रगत जीवनशैलीची साक्ष देणारा आहे. जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात असलेल्या पाचखेड येथे नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननातून लोहयुगीन वस्तीचे महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले. या उत्खननात घरांचे अवशेष, लोखंडी वस्तू, मातीची भांडी, तांदळाचे दाणे तसेच इतर धान्यांचे पुरावे आढळले. या निष्कर्षांवरून सुमारे ३ हजार वर्षांपूर्वी या भागात भात, गहू, तूर आणि मूग यांसारख्या पिकांची लागवड होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.(फोटो सौजन्य – AI)
या उत्खनन आणि संशोधनातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ते म्हणजे ३ हजार वर्षापूर्वी जिल्ह्यात भाताची शेती होत होती. आज कमी पावसाचा भाग मानला जाणारा यवतमाळसातवाहन काळापर्यंत दमट हवामानाचा होता. त्यानंतर हवामानात झालेल्या बदलांमुळे पर्जन्यमान घटले आणि शेतीच्या पद्धतीतही बदल झाले.
उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून त्या काळातील लोक शेतीबरोबरच मासेमारी, शिकार आणि धातूकामातही पारंगत होते. नदीतील शंख-शिंपल्यांचा उपयोग करून चुना तयार केल्याचे पुरावेही या उत्खननात आढळले. त्या काळातील विकसित वसाहतीची साक्ष ते देतात. पाचखेड येथील हा पुरातत्त्वीय शोध केवळ यवतमाळच नव्हे, तर विदर्भाच्या प्राचीन इतिहासाला नव्या दृष्टीने समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. भूतकाळातील समृद्ध संस्कृती, शेती आणि पर्यावरणाचा वेध घेणारा हा शोध इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
साधारणतः २०२३ दरम्यान नागपूर विद्यापीठाच्या पुरातन विभागाकडून पाचखेड गावानजीक उत्खनन आणि संशोधनाची सुरुवात झाली होती. यानंतर येथे ३ हजार वर्षांपूर्वीची लोहयुगीन वस्ती, घरांचे अवशेष, लोह आणि मातीची भांडी, तांदळाचे दाणे उत्खननातून मिळाले. त्यावेळी येथील लोक केवळ शाकाहारीच नव्हे तर मांसाहारी होते हे येथून मिळालेल्या शंख, शिंपले आणि माशांची हाडे यावरुन सिद्ध झाले.
सन ८ ३ हजार वर्षापूर्वी म्हणजेच ईसवी सन १०८ काळाच्या होत होती. हे स्पष्ट पुरावे आहेत. उत्खनन आणि संशोधनातून फक्त जंगलीच नव्हे तर लागवड केलेल्या तांदळाचे पुरावेही मिळाले. याचा अर्थ येथील हवामान भातशेतीसाठी त्याकाळी पोषक हवामान आणि आजच्या तुलनेत हा भाग खूप हिरवागार होता, अशी माहिती डॉ. प्रभास साहू, पुरातन विभाग प्रमुख,यांनी दिली आहे.






