मुंबई : मुंबईत म्हाडा लॉटरी (MHADA Lottery) दिवाळीमध्ये निघणार आहे. दिवाळीत मुंबईच्या तीन हजार घरांची लॉटरी निघेल. तर येत्या काही दिवसांत म्हाडा पुणे (MHADA Lottery 2022 Pune) विभागासाठी घरांची सोडत काढणार आहे. यात तब्बल साडेचार हजारपेक्षा जास्त घरं असणार आहेत. पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आलाय. म्हाडाचे (Mhada News) पुणे विभागाचे अधिकारी असलेल्या नितीन माने पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुणे विभागासाठी तब्बल 4 हजार 744 इतक्या घरांची सोडत काढली जाणार आहेत. येत्या काही दिवसांत त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर गृहस्वप्न साकार करण्याचं स्वप्न पाहिलेल्यांना लॉटरीसाठी अर्ज भरता येऊ शकेल.
[read_also content=”भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीला संपूर्ण महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद! https://www.navarashtra.com/maharashtra/spontaneous-response-from-all-over-maharashtra-to-the-grand-maharashtra-kesari-bullock-cart-race-organized-by-rohit-pawar-nrps-288017.html”]