Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बलात्कारातील पीडितेच्या दुचाकीला लावले जीपीएस..! कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपी तरुणाचा प्रताप

बलात्कार तसेच आठ लाखांचे दागिने घेऊन फसवणूक करणाऱ्या तरुणाने कारागृहातून जामीनावर बाहेर आल्यानंतर पिडीत तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला 'जीपीएस' लावl तिचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला ही बाब समजताच तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तरुणावर गुन्हा नोंद केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 19, 2024 | 02:44 PM
बलात्कारातील पीडितेच्या दुचाकीला लावले जीपीएस..! कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपी तरुणाचा प्रताप
Follow Us
Follow Us:

पुणे / अक्षय फाटक  : बलात्कार तसेच आठ लाखांचे दागिने घेऊन फसवणूक करणाऱ्या तरुणाने कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर पीडित तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला ‘जीपीएस’ लावला. तिचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तरुणीला ही बाब समजताच तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तरुणावर गुन्हा नोंद केला.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी लखन महादेव भिसे (वय २५ रा. पिंपळी, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २३ वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित तरुणी शुक्रवार पेठेत राहते. ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. लखन भिसे आणि या पीडित तरुणीची गेल्या वर्षी विवाह संकेतस्थळावरून ओळख झाली होती. अनोळखीनंतर त्यांच्यात मैत्री झाली. लखन याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच, तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यासोबतच वेगवेगळी कारणे सांगत तिच्याकडून ८ लाख तीन हजार रुपयांचे दागिने घेतले होते. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली.

तसेच, दागिनेही परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने खडक पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी भिसेवर फसवणूक, बलात्कार, अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अटकेनंतर तो न्यायालयीन कोठडीत गेला. तो कारागृहातून नुकताच जामिनावर बाहेर आला.

दरम्यान, खडक पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच लखन बाहेर आला आणि पुन्हा त्याने या तरुणीचा पाठलाग सुरू केला. त्याने यादरम्यान नामी शक्कल लढवली. त्याने तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या नकळत दुचाकीला ‘जीपीएस’ लावले व तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरू केले.

तसेच तिचा चोरून पाठलाग केला. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आला. तेव्हा तिने पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, तरुणीच्या दुचाकीवरून जीपीएस काढले असून, ते तपासणीसाठी पाठवले आहे. सिमकार्ड कोणाच्या नावावर आहे, याची माहिती मागवली आहे, अशी माहिती उपनिरीक्षक स्वाती भोरड यांनी दिली.

Web Title: Gps attached to rape victim bike incident in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2024 | 02:39 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • pune news
  • rape victim

संबंधित बातम्या

टीबीमुक्त भारतासाठी ‘रील’चा फंडा; परिचारिका आणि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी
1

टीबीमुक्त भारतासाठी ‘रील’चा फंडा; परिचारिका आणि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; विवाहाच्या आमिषाने पंजाबमधून पळवून आणले, जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले अन्…
2

अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; विवाहाच्या आमिषाने पंजाबमधून पळवून आणले, जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले अन्…

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित
3

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित

Yavatmal News: महात्मा फुले चौक अखेर अतिक्रमणमुक्त! वाहतूक पोलिसांनी केली कारवाई; फुटपाथवरील दुकाने हटविली
4

Yavatmal News: महात्मा फुले चौक अखेर अतिक्रमणमुक्त! वाहतूक पोलिसांनी केली कारवाई; फुटपाथवरील दुकाने हटविली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.