Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : नजीक पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; माजी आमदार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमाने सामाजिक प्रबोधन करण्यात आले. ​मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सुमारे १००० अनुयायांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 25, 2026 | 07:40 AM
Solapur News : नजीक पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; माजी आमदार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

Solapur News : नजीक पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; माजी आमदार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

Follow Us
Follow Us:

​मोहोळ : मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथे ‘विश्वरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात भव्य मिरवणूक, भीमगीतांचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

​कार्यक्रमाचे उद्घाटन मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मोहोळ पंचायत समितीचे सभापती अस्लम चौधरी, उपसभापती अलका पाटील, जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे, बालाजी नरुटे, सचिन जाधव, नागेश भोसले आणि विमल खताळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गुरुवारी (दि.​२३) सायंकाळी ६ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. फटाक्यांची भव्य आतिषबाजी आणि ‘जय भीम’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. लेझीम पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर अबालवृद्धांसह महिलांनी मोठा उत्साह दर्शवला. भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमाने सामाजिक प्रबोधन करण्यात आले. ​मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सुमारे १००० अनुयायांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या वतीने फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.

​भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने १९८४ पासून सलग ४२ वर्षे ही जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या वातावरणात ही मिरवणूक पार पडली. ​या सोहळ्याचे नियोजन मंडळाचे मार्गदर्शक व माजी उपसभापती अशोक सरवदे आणि अध्यक्ष ऋतुराज गजगाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लखन काळे, समाधान शिवशरण, दादा काळे, बाजीराव सरवदे, सुरज बनसोडे, आनंद सरवदे, बाळू काळे, गौतम काळे, प्रवीण सरवदे, प्रमोद सरवदे आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Grand procession held at nearby pimpri on the occasion of dr babasaheb ambedkar jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 07:40 AM

Topics:  

  • Dr. Babasaheb Ambedkar
  • Mohol News
  • Solapur News

संबंधित बातम्या

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
1

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा
2

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली
3

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग
4

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.