Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा

GSB Ganpati: जीएसबी गणपतीची ख्याती जगभर पसरली आहे. सर्वात श्रीमंत ही ख्याती असण्यासह या मंडळात ५ दिवसात अनेक पूजाविधी आणि महाप्रसाद केले जातात. याशिवाय अन्नदान सेवाही दिली जाते

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 13, 2026 | 05:50 PM
५ दिवसात होणार लाखाच्या वर पूजापाठ

५ दिवसात होणार लाखाच्या वर पूजापाठ

Follow Us
Follow Us:
  • जीएसबी गणपतीच्या पंडालमध्ये होणार १ लाखापेक्षा अधिक पूजा
  • ५ दिवसांत २ लाखांपेक्षा महाप्रसाद आणि अन्नदान सेवा
  • ७२ वे वर्ष करणार साजरे 
GSB Ganpati: नीता परब/ मुंबईतील वडाळा स्थित जीएसबी सेवा मंडळाचा अर्थात  ‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ महागणपतीचे यंदा ७२ वे वर्ष आहे. या ऐतिहासिक ७२ व्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर (१४  ते १८ सप्टेंबर ) दरम्यान विविध पवित्र पूजाविधी होणार आहेत. 

जी.एस.बी. सेवा मंडळ  हे अखंड अध्यात्म, धार्मिक निष्ठा आणि पवित्र पूजाविधींसाठी विशेष प्रसिद्ध असल्याचे संबोधले जाते.ज्यामुळे देशभरातील भाविक या पवित्र धार्मिक सेवेसाठी पाच दिवस आवर्जून हजेरी लावतात. यावर्षी या बाप्पाचा तब्बत ७०३ कोटींचा विमा उतरविण्यात आला आहे. केवळ ५ दिवस या बाप्पाचं दर्शन घेता येतं आणि इथे भाविकांची अक्षरशः रांग लागलेली दिसून येते. हा बाप्पा नवसाला पावतो अशी त्याच्या आख्यायिका सांगितली जाते आणि त्यामुळेच इथे खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. नवस पूर्ण झालेले भक्त इथे आपल्या वजनाइतक्या गोष्टी दानही करतात. 

१,००,००० हून अधिक पूजा आणि सेवा होणार

पाच पवित्र दिवसात विविध धार्मिक पूजा आणि अन्नदान सेवा होणार असून या पावन दिवसांत  पारंपरिक वैदिक पुरोहितांच्या हस्ते १,००,००० हून अधिक पूजा व सेवा संपन्न होणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव

कशाप्रकारे असणार मुख्य धार्मिक सेवा व पूजा:

  • विशेष पूजा: महा मूढगणपती पूजा व मूढगणपती पूजा
  • हवन व नैवेद्य: सहस्र मोदक हवन व मोदक नैवेद्य
  • पुष्प सेवा: पुष्प पूजा, पूर्ण दिवस पुष्प सेवा आणि रंग पूजा
  • अर्चन व दीप सेवा: दीपाराधना सेवा व दुर्वा अर्चा सेवा
  • अन्न व प्रसाद सेवा: महाभोग सेवा, प्रसाद वितरण सेवा आणि सहस्र भोजन सेवा
  • विशेष नवस व सेवा: तुळाभार सेवा आणि पूर्ण दिवस सेवा

५ दिवसांत २ लाखांपेक्षा अधिक भक्तांना महाप्रसाद व अन्नदान सेवा

सेवेच्या प्रदीर्घ परंपरेला जपत, या उत्सवादरम्यान दररोज ४०,००० भाविकांना ताजा महाप्रसाद दिला जाणार आहे. अशा प्रकारे ५ दिवसांत २ लाखांपेक्षा जास्त भाविकांसाठी अन्नदान सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

Mumbaicha Raja First Look: कमळावर उभा, अष्टभुजा अवतारी; मुंबईच्या राजाचा पहिला लुक

गणेशोत्सवात ‘गो ग्रीन’ उपक्रम

जीएसबी मंडळाकडून गणेशोत्सवामध्ये डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यात येत असून, पारंपरिक आणि छापील पावत्यांची पद्धत बंद केली आहे. यामुळे कागदाचा अपव्यय टाळला जातो आणि पर्यावरणपूरक उत्सवाला चालना मिळते. या गणेशोत्सवात मंडळाकडून ‘गो ग्रीन’ (पर्यावरणपूरक) उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच महागणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक असून, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने मंडळाकडून पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Gsb ganpati mandal to perform more that 1 lakh puja in 5 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • GSB

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव
1

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव

Mumbaicha Raja First Look: कमळावर उभा, अष्टभुजा अवतारी; मुंबईच्या राजाचा पहिला लुक
2

Mumbaicha Raja First Look: कमळावर उभा, अष्टभुजा अवतारी; मुंबईच्या राजाचा पहिला लुक

Ganeshotsav 2026: १ ली आणि २ री खत्तरगल्ली गणपती का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास आणि परंपरा
3

Ganeshotsav 2026: १ ली आणि २ री खत्तरगल्ली गणपती का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास आणि परंपरा

Palghar Ganeshotsav 2026 : बाप्पांच्या स्वागतासाठी पालघर जिल्हा सज्ज! 12564 मूर्तींची होणार प्रतिष्ठापना; कडेकोट पोलीस बंदोबस्त
4

Palghar Ganeshotsav 2026 : बाप्पांच्या स्वागतासाठी पालघर जिल्हा सज्ज! 12564 मूर्तींची होणार प्रतिष्ठापना; कडेकोट पोलीस बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.