Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकमंत्री शंभूराज देसाई गट नाराज, चर्चांना उधाण; सोशल मीडियावर निनावी पोस्ट व्हायरल

खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या कथीत अन्यायाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर निनावी पोस्ट व्हायरल करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध चर्चांना उधाण आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 19, 2024 | 01:21 PM
पालकमंत्री शंभूराज देसाई गट नाराज, चर्चांना उधाण; सोशल मीडियावर निनावी पोस्ट व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

पाटण : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या कथीत अन्यायाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर निनावी पोस्ट व्हायरल करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीने इच्छूकांना बरीच मोठी प्रतीक्षा करावयास लावली. महाविकास आघाडीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतली. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांना महायुतीने प्रदीर्घ प्रतीक्षा करायला लावून अखेर उमेदवारी जाहीर केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना या निवडणुकीत निर्णायक भूमिका कराड व पाटण तालुक्यातील मतदार बजावतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

पाटण तालुक्यातील मतदान निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई जी भूमिका स्वीकारतात, ती कार्यकर्ते डोळे झाकून पार पाडतात, असा अनुभव आहे. त्यामुळेच खासदार भोसले यांना देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलून चालणार नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र पहिल्याच प्रचार दौऱ्यात खासदार भाेसले यांनी पालकमंत्री देसाई यांच्या गटाला डावलल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

उदयनराजे भोसले यांनी गेल्या आठवड्यात तालुक्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते; परंतु मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या देसाई गटाला निमंत्रण देण्यात आले नसल्याने त्यांच्या कार्यकत्यांत नाराजी असल्याची पोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यापूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील बंगल्याजवळच्या भिंतीवर काढण्यात आलेले उदयनराजेंचे तैलचित्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ सातारा येथे होणाऱ्या आयलंडच्या जागेला केलेला विरोध, अशा विविध कारणांमुळे देसाई गट नाराजी व्यक्त करत आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या समर्थकांकडून हा मेसेज विविध ग्रुप्सवर व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Guardian minister shambhuraj desai group upset sparks discussions anonymous post goes viral on social media nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2024 | 01:21 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Shambhraj Desai

संबंधित बातम्या

शंभूराज देसाईंच्या बूस्टर डोसने शिंदेंची शिवसेना चार्ज; कार्यकर्त्यांमध्ये संचारली नवी ऊर्जा
1

शंभूराज देसाईंच्या बूस्टर डोसने शिंदेंची शिवसेना चार्ज; कार्यकर्त्यांमध्ये संचारली नवी ऊर्जा

Narendra Modi : “जेव्हा निकाल येईल, तेव्हा एकमेकांचे झिंझ्या उपटतील…”, बिहार मतदानावरून पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर हल्लाबोल
2

Narendra Modi : “जेव्हा निकाल येईल, तेव्हा एकमेकांचे झिंझ्या उपटतील…”, बिहार मतदानावरून पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर हल्लाबोल

Maharashtra Politics: लेकीसाठी बापाचा त्याग! ‘या’ कारणासाठी नेत्याने दिला पदाचा राजीनामा
3

Maharashtra Politics: लेकीसाठी बापाचा त्याग! ‘या’ कारणासाठी नेत्याने दिला पदाचा राजीनामा

Bihar Election 2025 voting : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, सकाळी ९ वाजेपर्यंत किती टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे झाले?
4

Bihar Election 2025 voting : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, सकाळी ९ वाजेपर्यंत किती टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे झाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.