
शहरात आहेत अर्धवट स्थितीत तुटलेली दुकाने
रस्ता डांबरीकरण केव्हा होणार याकडे लागले लक्ष
प्रशासकीय अनास्थेमुळे गुहागरचे हतिय विद्रुपीकरण ?
गुहागर: गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या झिरो नंबर पासून ते ८०० मीटर पर्यंतच्या भूसंपादन प्रक्रिय अंतर्गत प्रांताधिकाऱ्यांनी जाग हस्तांतरणातून सर्व दुकाने पाडावयास लावली. मात्र ३० ऑक्टोबरनंत झालेल्या या कारवाईनंतर पुढे काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
केवळ प्रशासकीय अनास्थेपोटी यानंत कार्यवाहीने गती न घेतल्याने शहराच विद्रुपीकरण झाले आहे. जागा ताब्यान मिळूनही राष्ट्रीय महामार्गाला ठेकेदार सापडत नसल्याने प्रशासनाच्य कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त हो आहे. शहरातील मुख्य नाक्यापासून चौदाशे मीटर पर्यंत भूसंपादनाच्च प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
लवादा जाहीर झाल्यानंतर संबंधित जागा -मालकांना मिळणाऱ्या मोबदल्याबाबतची – नोटीस देऊन कागदपत्र सादर करावयाच्या – सूचना केल्या आहेत. ज्यांचे कागदपत्र योग्य – आहेत त्यांना जमिनीचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. यातच जागा खाल करण्याबाबतची कोणतीही पूर्व नोटीस न देत प्रांताधिकाऱ्यांनी ३० ऑक्टोबर रोजी शहरान जागा राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यान देण्यासाठीचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले.
National Highway Work: छत्रपती संभाजीनगर- पैठण महामार्गाबाबत समोर आली ‘ही’ महत्वाची बातमी
जमीन मोबदल्याची रक्कम मिळवण्यासाठी कागदप सादर करताना आपण आपल्या जमिनीच्च ताबा देत असल्याची लेखी स्वरुपात कबुल दिली आहे. यामुळेच प्रांताधिकारी यांनी थेन जागा खाली करण्याची कार्यवाही केली. काह मोठ्या दुकानदारांना सदर जागा चार दिवसांन खाली कराव्यात, अशी मुदत देण्यात आल मात्र आज अर्धवट स्थितीत तुटलेली दुकान शहराच्या विद्रुपीकरणात भर टाकत आहेत.
जागा वाहतुकीसाठी मोकळी करावी…
राष्ट्रीय महामार्ग १८ मीटरचा करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाकडे जागा वर्ग केली. मात्र राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने या विषयाकडे गेले वीस दिवस पूर्णतः पाठ फिरवली. जी दुकाने काढण्यात आली आहेत, जी अर्धवट स्थितीत आहेत ती पूर्णत: काढून शहराच्या नाक्यामध्ये होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सदर जागा मोकळी करावी, असे नियोजन राष्ट्रीय महामार्गाने करणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले दिसत नाही. यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची अनास्था दिसून येत आहे. प्रांताधिका-यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
रस्ता डांबरीकरण केव्हा होणार याकडे लागले लक्ष
शहरातील १८०० मीटर पर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मोठमोठ्या, खड्यांनी वाहन चालकांचे कंबरडे मोडत आहे. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर उडणारी धूळ शहरातील जनतेच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये जात आहे. असे असताना पाऊस गेल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण होईल, असे आश्वासन देणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला अजून ठेकेदार मिळू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाराजीचा उमटतोय सुर
दुकाने पाडून २२ दिवस झाले तरी पुढील कार्यवाही नाही.
नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी.