गुलाबराव पाटील : राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) चांगलेच चर्चेत आले होते. नुकतंच गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘युवारंग महोत्सवा’त ते बोलत होते. माध्यमांशी बोलताना आपण चुकून राजकारणात पडलो असल्याची कबुली गुलाबराव पाटील यांनी दिली. फक्त नोकरी आणि छोकरी एवढंच होते, असेही पाटील यांनी म्हटले. या गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून ते आता प्रचंड चर्चेत आले आहेत. पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की, नोकरी आणि छोकरी एवढंच माझं स्वप्न होते. मी राजकारणात चुकून आलो. मी राजकारणात यावे असे माझे कधी स्वप्न नव्हते. मला राजकारणाची आवड देखील नव्हती, असेही त्यांनी सांगितले.
महाविद्यालयीन जीवनात नाटकात काम करण्याची आवड होती. त्यातून चांगलं बोलण्याची कला अवगत झाली होती. त्यावेळी आपल्या गावात नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शाखा आपल्या गावात स्थापन झाली होती. या शाखेत आपण यावे आणि आपण तरुणांना संबोधित करावे असे अनेकांना वाटत होते. त्यातूनच आपला राजकारणात प्रवेश झाला आणि कधी नव्हे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात आपल्याला बोलण्याची संधी मिळाली आणि आपण राजकारणात घट्ट रोवलो गेलो असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
महाविद्यालयीन जीवनात आपण अवगत केलेली वकृत्व कला आणि नाटक याचा राजकारणात फायदा झाला असल्याचे त्यांनी म्हटले. राजकारणात ही आपल्याला नेहमी या दोन्ही गोष्टींचा उपयोग झाला आहे. नाहीतर शिक्षण घेऊन नोकरी करावी आणि लग्न करावे एवढेच आपले स्वप्न होते असेही त्यांनी म्हटले.