Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: गारपीट आणि वादळ! चिखली तालुक्यात पिकांचे भारी नुकसान; जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे Malkapur, Nandura, Shegaon आणि Jalgaon Jamod तालुक्यांत गहू, हरभरा व कांदा पिकांचे नुकसान झाले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 20, 2026 | 06:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

गत दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी घाटाखालच्या Malkapur, Nandura, Shegaon आणि Jalgaon Jamod तालुक्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा आणि कांदा पिकांना फटका बसला. त्यानंतर गुरुवारी Chikhli तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Devendra Fadnavis : चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ, परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर

या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीस आलेले गहू, हरभरा, मका यांसारखी पिके तसेच आंबा व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गारांच्या माऱ्यामुळे उभे पीक आडवे झाले असून काही ठिकाणी काढणी करून ठेवलेला हरभरा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच वाढले आहे. अचानक आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती.

यापूर्वीच खरीप हंगामात ढगफुटीसदृश्य पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुग आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात उरलेल्या पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. लागवड खर्च देखील निघणे कठीण झाले असताना आता रब्बी हंगामातील पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू झाली. सुमारे १५ ते २० मिनिटे झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.

Washim News : शाश्वत शेतीसाठी समन्वयाची नितांत गरज! जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन; जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा

दरम्यान, Malkapur तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे बीजवाईच्या कांद्याचे पीक आडवे झाले. नरवेल येथील शेतकरी विलास कोथळकर यांच्या शेतातील कांद्याचे पीक जमिनीवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच इतर भागांतही गहू आणि कांदा पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

एकूणच, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे चिखलीसह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Hailstorm and storm severe damage to crops in chikhli taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News : जिगाव धरण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करा; मंत्री संजय सावकारे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
1

Buldhana News : जिगाव धरण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करा; मंत्री संजय सावकारे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

दुर्दैवी ! महाराष्ट्राच्या दोन वकिलांचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू; सैन्याच्या वाहनाला दुचाकीची धडक
2

दुर्दैवी ! महाराष्ट्राच्या दोन वकिलांचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू; सैन्याच्या वाहनाला दुचाकीची धडक

Washim : काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनाने वेधले लक्ष! राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराचा जिल्ह्यामधून निषेध
3

Washim : काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनाने वेधले लक्ष! राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराचा जिल्ह्यामधून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.