Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठरलं तर…! हर्षवर्धन पाटील ‘या’ दिवशी तुतारी हाती घेणार

हर्षवर्धन पाटील यांनी गुरूवारी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानी त्यांची भेट घेतली. जवळपास एक तास चर्चा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र आणि कन्या अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सअपच्या डिपीला तुतारी चिन्ह असलेला फोटो ठेवला.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 04, 2024 | 01:07 PM
हर्षवर्धन पाटील यांच्या त्या वक्तव्यावरून उजनी पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांची नाराजी

हर्षवर्धन पाटील यांच्या त्या वक्तव्यावरून उजनी पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांची नाराजी

Follow Us
Follow Us:

इंदापूर:  “आमचे छोटे-मोठे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मी निवडणूक लढवण्याची इ्च्छा आहे. निवडणूक लढवण्याबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. पण महायुतीतील जे विद्यमान सदस्य त्या ठिकाणी आहेत  त्याठिकाणी तेच निवडणूक लढवतील, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर दोन दिवासांपूर्वी शरद पवार यांनी मला सिल्व्हर ओकवर भेटायला बोलवले. त्यावेळी तिथे खासदार सुप्रिया सुळेही होत्या, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या गटात  प्रवेश करण्याची परवानगी दिली.” अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. ते इंदापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू  होत्या.  या सर्व चर्चांना त्यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. इंदापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. पण  पक्षप्रवेशाची तारीख स्वत: शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ठरवतील, असही त्यांनी सांगितले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित असला तरी त्यांच्या प्रवेशाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

हेही वाचा: आदिवासी आमदार आक्रमक, मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर मारल्या उड्या, नेमकं काय आहे कारण?

हर्षवर्धन पाटील म्हणाले,  शरद पवार मला म्हणाले मी सगळ्या इंदापूरचा कानोसा घेतला आहे. तुम्ही आमच्या राष्ट्रवादीत  यावं, सुप्रिया ताईंनीही होकार दिला. त्यानंतर मला इंदापूरला जाऊन माझी भूमिका सांगावी लागेल असेल त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांना विचारल्यावर आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावे,  अशी सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता.  कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मी घोषित करतो की, मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी असे आम्ही सर्वजण राष्ट्रवादी  काँग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेत आहोत.

हा निर्णय माझ्या एकट्याचा निर्णय नाही. भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यासोबत आम्ही काम केलं आहे.  त्यात रावसाहेब दानवे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह  इतर काही नेत्यांशीही बोललो.त्यांनाही यासंदर्भात कल्पना दिली आहे. म्हणून आम्ही  आज हा निर्णय घेत आहोत. इंदापूरमध्ये जनतेची भूमिका महत्त्वाची आहे. गेल्या 10 वर्षात जी माणसे आमच्या मागे ठामपणे उभी राहिली. पण त्यांना खूप त्रास झाला. गावागावात विकासकामाऐवजी अन्याय झाला.  हा जनतेचा उद्रेक या भागात झाला आहेत.

हेही वाचा: पुणे हादरलं! पोटच्या पोरीवर नराधम बापाकडून अत्याचार; धक्कादायक प्रकार उघडकीस

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी गुरूवारी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानी त्यांची भेट घेतली. जवळपास एक तास चर्चा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र आणि कन्या अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सअपच्या डिपीला तुतारी चिन्ह असलेला फोटो ठेवला. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी आपण पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करू, असं सांगितलं होतं.

 

 

 

Web Title: Harshvardhan patil will join sharad pawars ncp nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 12:29 PM

Topics:  

  • BJP

संबंधित बातम्या

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
1

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा
2

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
3

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
4

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.