आदिवासी आमदार आक्रमक,मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर मारल्या उड्या
गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे.
तर दुसरीकडे आदिवासांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी (02 ऑक्टोबर) सह्याद्री अतिथीगृह येथे भेटायला गेलेल्या राज्यातील आदिवासी आमदारांना भेटीसाठी तब्बल सात तास वाट बघावी लागली. सात तास बसून राहून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट न होऊ शकल्याने आदिवासी आमदारांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी होती. यानंतर यानंतर आदिवासी आमदारांनी आज, शुक्रवारी (04 ऑक्टोबर) मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र त्यानंतर नरहरी झिळवाळ यांच्यासह काही आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उडी मारली.
मंत्रालयातील मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच बाहेर आदिवासी आमदारांचं आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अश्वासनानंतरही आदिवासी आमदारांचे आंदोलन सुरु आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरळी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत. संरक्षक जाळीवरुन बाहेर काढल्यानंतर आमदारांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन पुकारलेय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवाळ यांनी आंदोलन पुकारले. सध्या त्यांना संरक्षक जाळीवरुन खाली उतरवण्यात आले. त्यांनी मंत्रालयात आंदोलन सुरु केलयं.
आदिवासी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्य मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर उडी मारली.आज सकाळपासून आदीवासी आमदारांनी मंत्रालयामध्ये आंदोलन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सकाळी या आमदारांनी अडवलं होतं. आदिवासी आरक्षणाअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी आदिवासी समजाच्या आमदारांनी आंदोलन पुकारलेय.
धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका सरकारने मागे घ्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसोबतच नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी आमदार आंदोलनातही सहभाग घेतला आहे. ज्या समाजाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. पेसी भरतीच्या ऑर्डर तयार असताना कोर्टाच्या आदेशामुळे त्या देण्यात आलेल्या नाहीत असं झिरवळ म्हणाले होते.