Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसमध्ये इनकमिंगचा मोठा धमाका होणार! पक्षात येणाऱ्यांची यादी मोठी; हर्षवर्धन सपकाळ यांचे सूचक विधान

काँग्रेसचे यापुढे महाराष्ट्र हेच लक्ष्य असून, पक्षात येणाऱ्यांची यादीही मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2026 | 02:18 PM
काँग्रेसमध्ये इनकमिंगचा मोठा धमाका होणार! पक्षात येणाऱ्यांची यादी मोठी; हर्षवर्धन सपकाळ यांचे सूचक विधान

काँग्रेसमध्ये इनकमिंगचा मोठा धमाका होणार! पक्षात येणाऱ्यांची यादी मोठी; हर्षवर्धन सपकाळ यांचे सूचक विधान

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये मोठ्या पक्षप्रवेशांचे संकेत
  • रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर सपकाळांचे सूचक विधान
  • सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचे सुनील तटकरेंकडून स्वागत
पुणे : काँग्रेसचे यापुढे महाराष्ट्र हेच लक्ष्य असून, पक्षात येणाऱ्यांची यादीही मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, हे पक्षाचे नेते निश्चित करतील, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभानंतर पत्रकारांशी हर्षवर्धन सपकाळ यांनी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात सपकाळ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त दावा केला. तसेच रोहित पवार चांगले काम करत आहेत. त्यांच्या पक्षातील अंतर्गत मतभेदांवर भाष्य करणे योग्य नाही. आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. त्यांच्या कामाची प्रशंसाच आहे, असे सूचक विधानही सपकाळ यांनी केले.

माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते हर्षवर्धन पाटील यांचे चुलतबंधू मयूरसिंह पाटील यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावर काँग्रेसचा राज्यभर संघटनात्मक विस्तार सुरू आहे. काँग्रेस राज्यातील सर्व भागांत संघटना मजबूत करत आहे. अलीकडे पक्षात अनेक प्रवेश झाले आहेत. आगामी काळात आणखी मोठे प्रवेश होतील, असे सपकाळ म्हणाले.

मतदारसंघ पुनर्रचनेबाबत इंडिया आघाडीच्या पातळीवर समन्वय सुरू आहे. आघाडीतील घटक पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे. सुप्रिया सुळे यांनीही कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नसल्याची भूमिका मांडली आहे. त्यांच्या विधानावर विश्वास ठेवला पाहिजे. मात्र, हे विधेयक संसदेत आलेले नाही. त्यावर आतापासून बोलणे योग्य नाही, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

सुळेंच्या भूमिकेचे स्वागत – तटकरे

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मांडल्यानंतर त्याबाबत भूमिका स्पष्ट करू, असे सुळे यांनी म्हटले आहे. प्रत्येक राज्यात समान पद्धतीने लोकसभेच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव असेल, तर त्याला पाठिंबा देण्याची त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांच्या या विधानाचा अर्थ भाजपला पाठिंबा देणार, असा काढणे योग्य नाही, असे तटकरे यांनी सांगितले.

देशाच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाच्या गाभ्याला अनुसरून सुळे यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचे स्वागत करायला हवे. पवारांच्या पक्षातील खासदार इकडे-तिकडे जाणार, अशा निराधार आणि कपोलकल्पित चर्चा करणेही चुकीचे आहे. शिंदे हे राज्याचे नेते आणि उपमुख्यमंत्री आहेत. ते दौऱ्यावर असताना कोणीही त्यांची भेट घेऊ शकते. विकासकामे सांगण्यासाठी पवारांचे आमदार त्यांना भेटत असतात. अशा भेटींचा राजकीय अन्वयार्थ काढणे योग्य नाही, असे तटकरे यांनी नमूद केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी निषेध केला. सुनेत्रा पवार यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाला यापूर्वीच कळवले आहे. सद्य:स्थितीत त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पक्षाच्या चिन्हासंदर्भातील सुनावणी अद्याप सुरू झालेली नसून, ती सुरू झाल्यानंतर किंवा योग्य वेळी याबाबतची माहिती दिली जाईल, असेही तटकरे म्हणाले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेत मांडली आहे. अजितदादा हे महाराष्ट्राचे मोठे नेतृत्व होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत कोणतीही घाई न करता योग्य पद्धतीने तपास होणे आवश्यक आहे, असे मत शेलार यांनी व्यक्त केले. अजितदादा यांचा पुतळा उभारण्याला सांस्कृतिक विभागाने मान्यता दिल्याचे शेलार यांनी सांगितले. परंतु पुतळा तयार आहे, संबंधित शिल्पकाराला अद्याप पैसे मिळाले नसल्याबद्दल विचारले असता, या प्रकरणाची माहिती घेऊन त्यावर भाष्य करेन, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी होणाऱ्या खर्चावर मर्यादा घालणार का, यावर बोलताना शेलार यांनी संमेलन आणि साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडे निर्णय सोपवला. साहित्य परिषदेचे पदाधिकारी निर्णय घेताना दुष्काळी परिस्थितीचा विचार करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा कोणी केला?

    Ans: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होतील, असा दावा केला.

  • Que: रोहित पवार यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

    Ans: रोहित पवार चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामाची आम्ही प्रशंसा करतो. त्यांच्या पक्षातील अंतर्गत मतभेदांवर भाष्य करणे योग्य नसल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

  • Que: सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे. त्यांच्या विधानाचा अर्थ भाजपला पाठिंबा देणार असा काढणे चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Harshvardhan sapkal has made a significant statement regarding new entrants into the congress party nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Latur News: अमित देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे तीव्र आंदोलन; प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी
1

Latur News: अमित देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे तीव्र आंदोलन; प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी

Ashish Shelar : ‘सोनिया गांधींचं पुस्तक फाडणं मान्य नाही!’ शिंदेंच्या शिवसेनेने पुस्तक फाडलं, भाजपच्या शेलारांनी स्पष्टच सांगितलं
2

Ashish Shelar : ‘सोनिया गांधींचं पुस्तक फाडणं मान्य नाही!’ शिंदेंच्या शिवसेनेने पुस्तक फाडलं, भाजपच्या शेलारांनी स्पष्टच सांगितलं

Ramayan Movie Controversy : रामायण सिनेमावरून राजकारण तापलं! काँग्रेसचा RSS, विश्व हिंदू परिषदेवर हल्लाबोल
3

Ramayan Movie Controversy : रामायण सिनेमावरून राजकारण तापलं! काँग्रेसचा RSS, विश्व हिंदू परिषदेवर हल्लाबोल

UP Assembly Election : यूपी निवडणुकीसाठी काँग्रेस-सपाची तयारी; 23 नोव्हेंबरपासून जागावाटपाची चर्चा
4

UP Assembly Election : यूपी निवडणुकीसाठी काँग्रेस-सपाची तयारी; 23 नोव्हेंबरपासून जागावाटपाची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.