Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashish Shelar : ‘सोनिया गांधींचं पुस्तक फाडणं मान्य नाही!’ शिंदेंच्या शिवसेनेने पुस्तक फाडलं, भाजपच्या शेलारांनी स्पष्टच सांगितलं

Ashish Shelar : सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादात मंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. पुस्तक फाडणं मला मान्य नाही, असं स्पष्ट करत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या कृतीवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Nov 22, 2026 | 07:59 PM
Ashish shelar

Ashish shelar

Follow Us
Follow Us:
  • सोनिया गांधींचं पुस्तक फाडण्यावर आशिष शेलारांचं मोठं विधान
  • ‘पुस्तक फाडणं मला कधीच मान्य नाही’; शेलारांचं स्पष्ट विधान
  • निवडणूक प्रक्रियेवरून विरोधकांनाही सुनावलं
पुणे : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकावरून सुरू झालेला राजकीय वाद आता नव्या वळणावर आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून या पुस्तकाची प्रत फाडून निषेध करण्यात आला होता. यावरून बराच गदारोळ माजला होता. राजकीय वर्तुळात यामुळे मोठा वादंग घडत असतानाच मात्र, आता भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.

आशिष शेलार यांनी शिवसेना शिंदे गटाने केलेल्या पुस्तक फाडण्याच्या कृतीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. पुस्तक फाडणं मला कधीच मान्य नाही, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली.

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक डॉ. विजय चोरमारे यांच्या ‘गाथा भारतीय निवडणुकांची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शेलार बोलत होते. यावेळी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी साहित्य आणि पुस्तकांच्या महत्त्वावर भाष्य केले.

Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!

काय म्हणाले आशिष शेलार?

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले, “पुस्तक फाडणं मला मान्य नाही. मी कधीच कुठलं पुस्तक फाडलेलं नाही. पुस्तक आणि साहित्यनिर्मिती समाजाला प्रगल्भ करत असते. एखाद्या पुस्तकातील विचारांशी सहमत नसाल किंवा त्यावर आक्षेप असतील, तर त्यावर मत मांडता येऊ शकतं; मात्र पुस्तक फाडणं योग्य नाही,” असं शेलार म्हणाले.

शिंदेंच्या शिवसेनेच्या कृतीवर अप्रत्यक्ष नाराजी?

काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, संजय निरुपम, शायना एनसी आणि आनंद दुबे यांनी पत्रकार परिषद घेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध केला होता. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी पुस्तकाची प्रतही फाडण्यात आली होती.

निवडणूक प्रक्रियेवरून विरोधकांनाही सुनावलं

याच कार्यक्रमात शेलार यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेवरही भाष्य केलं. गेल्या ७५ वर्षांतील निवडणुकांचा आढावा घेण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये आक्षेपार्ह घटना घडल्या असतानाही विरोधकांनी त्यावेळी आवाज उठवला नाही, असा सवाल त्यांनी केला.

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांचा उल्लेख

सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील पक्ष आणि खासदारांच्या संख्येसंदर्भातील मुद्द्याचा उल्लेख करत शेलार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचा संदर्भ दिला. इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न निर्माण झाला होता. मग तोच निकष सध्याच्या राजकीय परिस्थितीत का लागू होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पुस्तक फाडण्याच्या कृतीवर शेलार यांनी व्यक्त केलेली नाराजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

Political News : ‘१५० कोटींचा भाव’ कसा सुरू होतो? संजय राऊतांच्या दाव्यावर प्रताप सरनाईकांचा घणाघात

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून वाद का निर्माण झाला?

    Ans: शिंदेंच्या शिवसेनेने 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाल्याचा आरोप करत पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आली आणि निषेध म्हणून पुस्तकाची प्रत फाडण्यात आली.

  • Que: आशिष शेलार यांनी पुस्तक फाडण्याच्या प्रकारावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: आशिष शेलार यांनी पुस्तक फाडण्याच्या कृतीला विरोध केला. पुस्तक आणि साहित्यनिर्मिती समाजाला प्रगल्भ करते. पुस्तकातील विचारांशी मतभेद असले तरी पुस्तक फाडणं योग्य नाही, असं ते म्हणाले.

  • Que: आशिष शेलार यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत काय म्हटलं?

    Ans: देशातील गेल्या ७५ वर्षांतील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. पूर्वीच्या निवडणुकांवर आक्षेप असतानाही विरोधकांनी त्यावेळी आवाज उठवला नाही, अशी टीका त्यांनी केली.

Web Title: Ashish shelar sonia gandhi book shiv sena book tearing controversy vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • BJP
  • shivsena
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

UP Assembly Election : यूपी निवडणुकीसाठी काँग्रेस-सपाची तयारी; 23 नोव्हेंबरपासून जागावाटपाची चर्चा
1

UP Assembly Election : यूपी निवडणुकीसाठी काँग्रेस-सपाची तयारी; 23 नोव्हेंबरपासून जागावाटपाची चर्चा

Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!
2

Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!

Food Scholarship Pune: पुण्यात १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दोन वेळचे जेवण; असा करा नोंदणीसाठी संपर्क
3

Food Scholarship Pune: पुण्यात १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दोन वेळचे जेवण; असा करा नोंदणीसाठी संपर्क

‘गरीब की बीवी सबकी…’ महासभेत असं काय बोलले ठाकरेंचे नगरसेवक? भाजप नगरसेवक धावून गेले अंगावर, महापौरांनी दोघांनाही बाहेर काढलं!
4

‘गरीब की बीवी सबकी…’ महासभेत असं काय बोलले ठाकरेंचे नगरसेवक? भाजप नगरसेवक धावून गेले अंगावर, महापौरांनी दोघांनाही बाहेर काढलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.