Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माहितीचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न’; RTI नियम 2026 रद्द करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

RTI नियम 2026 मधील शुल्कवाढ, 'प्रयोजन' नमूद करण्याची सक्ती आणि इतर तरतुदींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेप घेतला आहे. नागरिकांचा माहितीचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jun 20, 2026 | 06:53 PM
'माहितीचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न'; RTI नियम 2026 रद्द करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

'माहितीचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न'; RTI नियम 2026 रद्द करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Follow Us
Follow Us:

सरकारी कारभारात पारदर्शकता असावी आणि त्याचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी काँग्रेसप्रणित युपीए सरकारने जनतेला ऐतिहासिक असा माहिती अधिकार कायद्याचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार दिला आहे, पण सध्याच्या सरकारने मात्र नागरिकांना माहितीपासून दूर ठेवण्यासाठी अडथळ्यांची भिंत उभी केली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात गंभीर कायदेशीर त्रुटी व मूळ कायद्याशी विसंगत तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांचा माहितीचा अधिकारच काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला असून यामुळे शासनाच्या पारदर्शकतेच्या तत्त्वालाही धक्का पोहोचत आहे. सरकारने तातडीने या बेकायदेशीर तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

RTI नियम 2026 वर काँग्रेसचा आक्षेप

राज्याचे मुख्य सचिव यांना यासंदर्भात पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणतात की, “सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मध्ये बेकायदेशीर तरतुदी रद्द केल्या आहेत.”

“माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील, द्वितीय अपील तसेच माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना माहितीचा अधिकार वापरणे आर्थिकदृष्ट्या कठीण होईल आणि माहितीचा अधिकार अधिनियमाचा मूलभूत उद्देशच बाधित होईल.”

‘इतरांवर भोंगा वाजवणाऱ्या राऊतांचा भोंगा वर्धापनदिनाच्या मंचावरच म्यूट,’ भाजपची संजय राऊत यांच्यावर जोरदार आगपाखड

शुल्कवाढीवरून सरकारला सवाल

“केंद्र सरकार आजही माहिती अधिकारासाठी केवळ १० रूपये आकारते आणि अपिलसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. असे असताना राज्य सरकार जनतेकडून पैसे वसुलीची भूमिका का घेत आहे?”

“माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम ४(१)(क) व ४(१)(ड) नुसार जनतेवर परिणाम करणारा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना त्यामागील कारणे, वस्तुस्थिती, विचारप्रक्रिया व संबंधित माहिती स्वतःहून प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. तथापि, शुल्कवाढीचा निर्णय घेताना त्यामागील कोणतीही कारणमीमांसा, अभ्यास, आर्थिक विश्लेषण अथवा वस्तुनिष्ठ माहिती यात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

प्रयोजन’ नमूद करण्याची अट कायद्याविरोधात?

“विशेष म्हणजे, त्याच राजपत्रातील कलम ११(ग) मध्ये अनिवार्य माहिती स्वतःहून प्रसिद्ध करण्यात कसूर झाल्यास ती कर्तव्यच्युती मानून संबंधित कार्यालय प्रमुखावर सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे.त्यामुळे, स्वतःच घालून दिलेल्या तरतुदींचे पालन करण्यात झालेल्या कसुरीबद्दल सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्यावर कलम ११(ग) नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.”

“राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती अधिकार अर्जाच्या नमुन्यामध्ये अर्जदारास माहिती मागण्याचे “प्रयोजन” नमूद करण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही अट माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ६(२) शी स्पष्टपणे विसंगत आहे. माहिती अधिकार कायद्यातील सदर कलमानुसार माहिती मागणाऱ्या व्यक्तीस माहिती का हवी आहे, याचे कारण देणे आवश्यक नाही. त्यामुळे राजपत्राद्वारे संसदेने मंजूर केलेल्या मूळ कायद्याच्या तरतुदींचा अवमान करण्यात आला आहे.”

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सर्व नऊ आरोपी निर्दोष ; धाराशिवमध्ये पद्मसिंह पाटील समर्थकांचा जल्लोष

या पत्रात सपकाळ पुढे म्हणतात की, “दिनांक १२ जून २०२६ च्या राजपत्रातील बेकायदेशीर व कायद्याशी विसंगत तरतुदी तात्काळ रद्द करा. माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम ४ चे उल्लंघन केल्याबद्दल तसेच राजपत्रातील कलम ११(ग) नुसार सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. माहिती अधिकार अर्जाच्या नमुन्यातील “प्रयोजन” नमूद करण्याची अट तात्काळ रद्द करून त्याबाबत शुद्धीपत्रक (Corrigendum) प्रसिद्ध करण्यात यावे.”

“शुल्कवाढीमागील कारणे, अभ्यास अहवाल, आर्थिक विश्लेषण व इतर सर्व संबंधित माहिती माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम ४ नुसार स्वतःहून सार्वजनिक करण्यात यावी. यापूर्वी राज्य सरकारने विविध विभागांना स्वतःहून माहिती अधिकारांतर्गत माहिती जाहीर करण्याचे आदेश अनेकदा दिले आहेत. तरीही अशी माहिती जाहीर न करणा-या किती विभाग प्रमुखांवर आपल्यातर्फे आजवर कारवाई करण्यात आली,” याची माहितीही देण्यात यावी.

Web Title: Harshvardhan sapkal opposes rti rules 2026 demands cancellation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • RTI activists

संबंधित बातम्या

गांधी भवनातील गोंधळावर हर्षवर्धन सपकाळ आक्रमक; ‘काँग्रेस कार्यालयावर हल्ल्यामागे भाजप व पोलिसांची फूस’
1

गांधी भवनातील गोंधळावर हर्षवर्धन सपकाळ आक्रमक; ‘काँग्रेस कार्यालयावर हल्ल्यामागे भाजप व पोलिसांची फूस’

‘गुंगी गुडिया’ वादावर हर्षवर्धन सपकाळांचे स्पष्टीकरण; टीकेचे समर्थन करत सुनेत्रा पवारांना दिला मोलाचा सल्ला
2

‘गुंगी गुडिया’ वादावर हर्षवर्धन सपकाळांचे स्पष्टीकरण; टीकेचे समर्थन करत सुनेत्रा पवारांना दिला मोलाचा सल्ला

‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
3

‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.