Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

गणपती बाप्पा, या सरकारला शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सुबुद्धी दे, अशी प्रार्थना गणरायाला केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 21, 2026 | 03:48 PM
बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे...; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे...; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. शेतातील पिके जळून गेली आहेत, जी पिकं शिल्लक आहेत ती पूर्णपणे वाया गेली आहेत म्हणून शेतकरी त्यावर नांगर फिरवत आहे. सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात चिंतेचे वातावरण आहे पण सरकार मदतीबाबत काहीही कारवाई करत नाही. गणपती बाप्पा, या सरकारला शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सुबुद्धी दे, अशी प्रार्थना गणरायाला केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

 

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, सरकार फक्त प्रक्रिया सुरु आहे एवढेच सांगत आहे पण ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करत नाही. महायुती सरकारने कुंभमेळ्यासाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मात्र सरकार चालढकल करत आहे. कर्जमाफी केली तीही फसवीच निघाली. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्याच्या बैठकीत अधिकारी व्हिडिओ पहात असतात, तर सत्ताधारी पक्षाचे खासदार काजू-बदाम खात आहेत. सरकारने लाजलज्जा सर्व सोडून दिले आहे, त्यांना कशाचेही गंभीर्य राहिलेले नाही. विधानसभेत मोबाईलवर रम्मी खेळणारा कृषी मंत्री याआधी राज्याला लाभला होता, आता अधिकारी मोबाईलवर व्हिडिओ पहात बसतात, यांना शेतकऱ्यांचे काही देणेघेणे राहिलेले नाही.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, तरुणाई राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, हे चित्र भारतीय जनता पक्षाची झोप उडवणारे आहे. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता व ते सरकारला थेट जाब विचारत असल्याने भाजपा नेते राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप व टीका करत असतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांनी स्टँडअप कॉमेडियनचे काम करावे अशी केलेली टीका, ही त्याचाच एक भाग आहे. फडणवीस यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे दिसत आहे, त्यामुळे त्यांना मी गेट वेल सून देवेंद्रजी, एवढेच म्हणतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हे सुद्धा वाचा : राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; CM होण्यासाठी त्यांनी…

इंग्रजांनी ज्याप्रमाणे तोडाफोडा व राज्य करा निती अवलंबली होती त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सरकार आरक्षणाच्या नावाखाली समाजातील विविध जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. मराठा-ओबीसी, आदिवासी, व्हिजेएनटी अशी भांडणे लावली जात आहेत. नाहीरे वर्गाला हात देण्याचे काम आहेरे वर्गाने करायला हवे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Harshvardhan sapkal has criticized the government over the farmers crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
2

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
3

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
4

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.