Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

बुलढाणा आणि चिखलीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. फेसबुक पोस्टमधून त्यांनी काँग्रेसच्या प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.

  • By विवेक
Updated On: Sep 20, 2026 | 08:19 PM
Congress flag

Congress flag

Follow Us
Follow Us:
  • काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार.
  • फेसबुक पोस्टमधून बोंद्रेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला.
  • बुलढाण्यातील या राजकीय घडामोडीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या जिल्ह्यात चर्चेला उधाण.
 

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतरांचं सत्र सुरूच आहे. आता बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिखलीचे माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी स्वतः केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

‘काँग्रेसने अनेक संधी दिल्या, जिवाभावाची माणसं दिली’; बोंद्रेंची भावनिक पोस्ट

राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या राजकीय निर्णयाची माहिती दिली. काँग्रेससोबतच्या प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना पक्षाने सामाजिक आणि राजकीय वाटचालीत अनेक संधी आणि पदं दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेससोबत काम करताना अनेक जिवाभावाची माणसं जोडली गेल्याचंही त्यांनी नमूद केलं.

आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला मुकुल वासनिक यांनी मार्गदर्शन केल्याचा उल्लेख बोंद्रे यांनी केला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्याला भावाप्रमाणे प्रेम दिल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

चिखलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ

मात्र, आता राजकीय वाटचालीला वेगळं वळण देण्याचा निर्णय घेतल्याचं बोंद्रे यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्याचवेळी काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांना आपण कधीही विसरणार नसल्याचंही त्यांनी भावनिकपणे नमूद केलं आहे.

राहुल बोंद्रे यांच्या या निर्णयामुळे चिखलीच्या राजकारणात नवं समीकरण तयार होण्याची चर्चा सुरू झाली आहे. बोंद्रे हे यापूर्वी चिखली मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून काँग्रेसकडून राहुल बोंद्रे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या श्वेता महाले यांनी त्यांचा पराभव केला.

बोंद्रेंच्या निर्णयानंतर बुलढाण्यात काँग्रेस-भाजप राजकारणाला नवं वळण

दरम्यान, बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला याआधीही उधाण आलं होतं. ऑगस्ट 2026 मध्ये त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत वृत्त प्रसिद्ध झालं होतं. आता मात्र बोंद्रे यांनी स्वतःच पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

या घडामोडीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चिखलीसह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपची स्थानिक संघटना या बदलाकडे कशा पद्धतीने पाहते, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Web Title: Rahul bondre bjp entry congress buldhana harshvardhan sapkal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • BJP
  • buldhana news
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा,  सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी
1

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा, सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
2

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त
4

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.