Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस राज्यात संविधान बचाव आणि सद्भावना यात्रा काढणार : हर्षवर्धन सपकाळ

कॉंग्रेसकडून राज्यात संविधान बचाव यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिल रोजी नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले आहे. दादरमधील बैठकीत हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 22, 2025 | 08:35 PM
काँग्रेस राज्यात संविधान बचाव आणि सद्भावना यात्रा काढणार : हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस राज्यात संविधान बचाव आणि सद्भावना यात्रा काढणार : हर्षवर्धन सपकाळ

Follow Us
Close
Follow Us:

कॉंग्रेसकडून राज्यात संविधान बचाव यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिल रोजी नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले आहे. तर १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ व ५ मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा व संविधान बचाव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

“… त्यामुळे ‘हे’ विधेयक रद्द करावे”; कृती समितीकडून पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन

दादर येथील टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार तारिक अन्वर, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, आ. प्रज्ञा सावत, आमिर शेख, प्रशासन ॲड. गणेश पाटील उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने २०२५ हे वर्ष संघटन वर्ष घोषित केलं आहे. संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून किमान १० पूर्ण दिवस वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये फिरावे, पक्षाने दिलेल्या आंदोलनात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी. जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हावे. नेमून दिलेल्या जिल्ह्यात महिन्यातून किमान ६ पूर्ण दिवस दौरे करावेत, दोन दिवस प्रदेश कार्यालयाने दिलेली जबाबदारी पूर्ण करावी. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला कार्यालयाला अहवाल सादर करावा. ३ बैठकांना सलग गैरहजर राहिल्यास त्या पदाधिकाऱ्याला कार्यमुक्त केले जाईल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

बैठकीत ठराव मांडण्यात आले. त्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली, वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्यास सर्व स्तरातून विरोध होत आहे. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेलं आहे. सरकारने भाषा समितीशी देखील चर्चा केलेली नाही. त्यामुळे या समितीनेही हिंदी भाषा सक्तीला विरोध केला, त्याचं स्वागत करण्यात आलं. राज्यात हिंदी भाषेची सक्ती करू नये, असा ठराव या बैठकीत मांडण्यात आला आला. राज्य आणि देशातील सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही लोक करत आहेत. रामदेव बाबानी ‘सरबत जिहाद’ आणला त्याच्या निषेधाचा ठरावही करण्यात मांडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, मात्र सरकारी भरती करताना मराष्ट्रातील तरुणांना डावललं जात आहे. आयकर विभागाच्या भरतीमध्ये महाराष्ट्रातील फक्त ३ मुलांची निवड झाली तर बहुसंख्य इतर राज्यातील आहेत. मुलाखत घेण्याऱ्यांमध्ये गुजरातमधील अधिकारी होते. भाजपने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला आहे हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असेही ते म्हणाले.

Cabinet Meeting : मत्स्य व्यवसायाला राज्यात कृषीचा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचा निर्णय

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, काँग्रेसने थोपटे घराण्याला ४० वर्ष आमदारकी दिली, मंत्रीपदे दिली, संग्राम थोटपे यांनाही चारवेळा आमदारकी दिली आहे. असं असतानाही पक्षावर आरोप करणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केलां. तसंच त्यांच्या कारखान्याचं काही काम असावं, त्यासाठी त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला असावा. असं वाटतं, असा टोला त्यांनी थोपटे यांना लगावला.

Web Title: Harshvardhan sapkal said congress will held samvidhan bachao yatra and sadbhavana yatra in maharashtra latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 08:35 PM

Topics:  

  • Harshwardhan Sapkal
  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
2

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
3

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
4

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.