Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुमचं गॅस कनेक्शन बंद होणार आहे….’ तुम्हालाही असा मेसेज आलाय का? आताच सावध व्हा

काही दिवसांपूर्वीच तुमच्या घराचा वीज पुरवठा खंडीत होणार आहे, असा मॅसेज देशभरातील लोकांच्या फोनवर आला होता. त्यानंतर आता तुमचं गॅस कनेक्शन बंद होणार आहे, असा मॅसेज अनेकांच्या फोनवर आला आहे. तुम्हाला देखील असा मॅसेज आला असेल, तर आत्ताच सावध व्हा. हा मॅसेज ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2024 | 11:45 AM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Close
Follow Us:

दिवसेंदिवस सर्वसामान्यांची फसवणूक होण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच तुमच्या घराचा वीज पुरवठा खंडीत होणार आहे, असा मॅसेज देशभरातील लोकांच्या फोनवर आला होता. त्यानंतर आता तुमचं गॅस कनेक्शन बंद होणार आहे, असा मॅसेज अनेकांच्या फोनवर आला आहे. तुम्हाला देखील असा मॅसेज आला असेल, तर आत्ताच सावध व्हा. हा मॅसेज ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. या मॅसेजमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मॅसेजमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. या मॅसेजबाबत आईजीएल (Indraprastha Gas Limited) ने सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ग्राहकांनी अशा प्रकारच्या मॅसेजवर विश्वास ठेऊ नये, असं आईजीएलने सांगितलं आहे.

मॅसेजमध्ये म्हटलं आहे की, ‘प्रिय ग्राहक. तुमच्या गॅस कनेक्शनचं बिल अपडेट झालेलं नाही. त्यामुळे तुमचं कनेक्शन तोडून टाकण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर फोन करा.’ या मॅसेजमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अनेकांनी याबाबत संबंधित गॅस कनेक्शनच्या कंपनीकडे तक्रार देखील केली आहे. केवळ मॅसेजच नाही तर फोनवरून देखील ग्राहकांची फसवूणक केली जाते. आपण संबंधित गॅस कनेक्शन कंपनीचा अधिकार बोलत असल्याचं हे लोक ग्राहकांना सांगतात. त्यानंतर तुमच्या गॅस कनेक्शनचं बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडलं जाणार आहे, अशी भिती ग्राहकांना फोनवरून घातली जाते. त्यानंतर जे ग्राहक बिल भरण्यासाठी तयार होतात, त्यांना एक लिंक पाठवली जाते. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं बँक खातं रिकामं होण्याची भिती असते.

या स्कॅमबाबत आईजीएल ने सर्व ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. आईजीएल अधिकाऱ्यांना म्हटलं आहे की, आपण आईजीएलचे अधिकारी बोलत असल्याचं सांगून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. फोनवरील व्यक्तिकडून ग्राहकांना बिल न भरल्यामुळे गॅस कनेक्शन तोडण्याची भीती घातली जाते. ग्राहकांनी अशा कोणत्याही मॅसेजवर आणि फोनवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. आयजीएलच्या अधिकृत वेबसाईट किंवा पर्यायांवर जाऊनच बिल भरा. आपला पासवर्ड, ओटीपी अशी माहिती कोणासोबतही शेअर करू नका. मॅसेजवर पाठवण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका.

काही दिवसांपूर्वीच देशभरातील लोकांच्या फोनवर एक मॅसेज आला होता. मॅसेजमध्ये म्हटलं होतं की, ‘प्रिय ग्राहक, आज रात्री ९.३० वाजता तुमच्या घराची वीज कापली जाणार आहे. लवकरात लवकर आमच्या विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.’ या मॅसेजमुळे सर्वांमध्येच प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यानंतर लोकांची फवसणूक करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये दहशत पसरवण्यासाठी हा मेसेज पाठविण्यात आला असल्याचे समोर आले. हा मेसेज बनावट असून नागरिकांनी ह्या मेसेजवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं.

Web Title: Have you also received the message your gas connection is about to be cut off be careful now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • cyber crime

संबंधित बातम्या

गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा
1

गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?
2

Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?

Cyber Crime News: ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली केली कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील धक्कादायक प्रकार उघड
3

Cyber Crime News: ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली केली कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील धक्कादायक प्रकार उघड

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
4

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.