Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त

Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली गुवाहाटी येथील एका वयोवृद्धाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई करत मोठी रक्कम जप्त केली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 07, 2026 | 08:48 PM
Cyber Crime : 'डिजिटल अरेस्ट'चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त

Cyber Crime : 'डिजिटल अरेस्ट'चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त

Follow Us
Follow Us:
  • TRAI, CBI आणि मुंबई क्राइम ब्रँचच्या नावाने वृद्धाला धमकावले
  • 19 व्यवहारांतून 2.13 कोटी उकळले
  • 43 खात्यांवर ईडीची कारवाई
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली गुवाहाटीतील एका ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने सहा बँकांमधील 43 खात्यांत जमा असलेली सुमारे 2.12 कोटी रुपयांची रक्कम तात्पुरती जप्त केली आहे. ही कारवाई मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत (Cyber Crime )करण्यात आली.

TRAI, CBI आणि क्राइम ब्रँचच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’

सप्टेंबर ते डिसेंबर 2025 दरम्यान सायबर ठगांनी स्वतःला TRAI, मुंबई क्राइम ब्रँच आणि CBIचे अधिकारी असल्याचे सांगून गुवाहाटीतील ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला. त्यांच्या आधारकार्डवर उघडलेले बँक खाते मनी लॉन्डरिंगमध्ये वापरले जात असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.

यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. बनावट न्यायालयीन कार्यवाही आणि बनावट ‘डिजिटल अरेस्ट वॉरंट’ दाखवून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. दर दोन तासांनी आपली उपस्थिती नोंदवण्यास सांगण्यात आले. तसेच कुणाला याबाबत माहिती दिल्यास ‘नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट’ अंतर्गत कारवाई करण्याची धमकी देण्यात आली.

Hingoli Crime : हिंगोलीत पेट्रोल पंपावर IOC अधिकाऱ्याची हत्या; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी घेतली गंभीर दखल

19 व्यवहारांतून 2.13 कोटी उकळले

कुटुंबाच्या निधीची ‘RBI चौकशी’ आणि त्यानंतर बनावट ‘बेल बॉन्ड’ च्या नावाखाली पीडिताला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 19 व्यवहारांतून सुमारे 2.13 कोटी रुपये पाठवण्यास भाग पाडण्यात आले. ही रक्कम उभी करण्यासाठी पीडिताने फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड आणि शेअर्स विकले. तसेच पेन्शन खात्यावर आणि विमा पॉलिसीवर कर्जही घेतले.

ईडीच्या तपासात फसवणुकीची रक्कम प्रथम ‘म्यूल अकाउंट्स’मध्ये जमा करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर ही रक्कम देशभरातील विविध व्यक्ती, कंपन्या आणि फर्मच्या बँक खात्यांमध्ये वेगवेगळ्या भागांत वळवण्यात आली.

पैशांचा माग काढणे कठीण व्हावे यासाठी काही रक्कम रोख स्वरूपात काढण्यात आली, तर काही रक्कम डिजिटल करन्सीमध्ये रूपांतरित करण्यात आली. तसेच पेमेंट गेटवे आणि इतर बँक खात्यांमध्येही पैसे वळवण्यात आल्याचे तपासात आढळले.

‘भूत काढण्याच्या’ बहाण्याने अघोरी विधी; फलटणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप

43 खात्यांवर ईडीची कारवाई

ईडीने पैशांच्या व्यवहाराचा माग काढत फसवणुकीच्या रकमेशी संबंधित 43 बँक खाती शोधून काढली. या खात्यांमध्ये शिल्लक असलेली सुमारे 2.12 कोटी रुपयांची रक्कम PMLAच्या कलम 5(1) अंतर्गत तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास ईडीकडून सुरू आहे.

Web Title: Cyber crime digital arrest ed action guwahati 2 12 crore seized 43 bank accounts rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • cyber crime
  • Digital Arrest
  • Enforcement Directorate

संबंधित बातम्या

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?
1

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?

Cyber Crime : MBBSच्या विद्यार्थ्यांनो सावधान, ही चुक केलात तर करिअर होईल खराब! सायबर विभागाच्या हाती मोठं रॅकेट
2

Cyber Crime : MBBSच्या विद्यार्थ्यांनो सावधान, ही चुक केलात तर करिअर होईल खराब! सायबर विभागाच्या हाती मोठं रॅकेट

Cyber Crime : सायबर क्राइमबाबत मुंबई पोलिसांची धडक कारवाई, ‘ही’ टोळी आली समोर
3

Cyber Crime : सायबर क्राइमबाबत मुंबई पोलिसांची धडक कारवाई, ‘ही’ टोळी आली समोर

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा
4

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.