
FDA Tukaram Munde Action on health suppliment pune
आरोग्यपूरक उत्पादने, प्रोटीन पावडर, वजन कमी करणारी उत्पादने, क्रीडा पूरक आहार, हर्बल कॅप्सूल, मल्टिव्हिटॅमिन्स आणि विशेष आहारासाठीच्या उत्पादनांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. मात्र, या उत्पादनांच्या नावाखाली अमान्य घटकांचा वापर, चुकीचे लेबलिंग, औषधी गुणधर्मांचे दावे आणि विनापरवाना विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या आहेत. याची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २० नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी अनुपालन आदेश जारी केला.
विशेष म्हणजे, भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) उत्पादन मान्यता नाकारलेल्या मॅग्नेशियम अॅसिटिल टॉरेट आणि निकोटिनामाइड मोनोन्यूक्लिओटाइड या घटकांचा काही आरोग्यपूरक उत्पादनांमध्ये वापर होत असल्याचे तपासणीत आढळले. जप्त केलेल्या साठ्यातील नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.
नव्या आदेशानुसार उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते, औषध दुकाने, व्यायामशाळा, फिटनेस सेंटर, रुग्णालयांना पुरवठा करणारे आणि ई-कॉमर्स कंपन्यांनाही नियमांचे पालन करावे लागणार आहे. औषध दुकान किंवा जिममध्ये अशी उत्पादने विकण्यासाठी स्वतंत्र अन्न परवाना अथवा नोंदणी आवश्यक असेल. रोग बरा करण्याचे, मधुमेह किंवा रक्तदाब नियंत्रित करण्याचे, झटपट वजन कमी करण्याचे तसेच डॉक्टरांनी शिफारस केल्याचे दिशाभूल करणारे दावे करता येणार नाहीत. सोशल मीडिया आणि प्रभावकांच्या जाहिरातींनाही हे नियम लागू असतील.
राज्यात या उत्पादनांच्या श्रेणीत सध्या १,१०० अन्न व्यवसाय परवाने कार्यरत आहेत. त्यामध्ये ३१३ उत्पादक, ७५९ पुनर्लेबलेर्स आणि २८ पुनर्पॅकर्सचा समावेश आहे. या सर्वांची जोखीमाधारित तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड, परवाना निलंबन किंवा रद्द करण्यासह गंभीर प्रकरणांत कारावासाचीही तरतूद आहे. नागरिकांनी संशयास्पद उत्पादन, लेबल किंवा जाहिरातींबाबत १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Ans: पुणे विभागातील विशेष तपासणी मोहिमेत ३० लाख ५७ हजार १२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
Ans: उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते, औषध दुकाने, जिम, फिटनेस सेंटर, रुग्णालयांना पुरवठा करणारे आणि ई-कॉमर्स कंपन्यांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
Ans: रोग बरा करण्याचे, मधुमेह किंवा रक्तदाब नियंत्रित करण्याचे, झटपट वजन कमी करण्याचे किंवा डॉक्टरांनी उत्पादनाची शिफारस केल्याचे दिशाभूल करणारे दावे करता येणार नाहीत. सोशल मीडिया आणि प्रभावकांच्या जाहिरातींनाही हे नियम लागू असतील.